लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच जणांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत़शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या उद्देशाने पोलीस प्रशासनाच्या वतीने हद्दपारीचे आदेश काढले जातात़ कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पुढाकार घेऊन यापूर्वी ११ जणांचे हद्दपारीचे प्रकरणे पूर्ण केली होती़ आता पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी आणखी पाच जणांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत़ या आदेशानुसार सुनील लक्ष्मण शिराळे, रवि प्रकाशराव गुज्जर, दीपक प्रकाश गुज्जर, अंबादास रामा गुज्जर (सर्व रा़ अण्णाभाऊ साठेनगर), मंगलसिंग दादरसिंग गुधानी (रा़ विकासनगर) या पाच जणांना एक वर्षासाठी हद्दपार केल्याचे आदेश काढले आहेत़ या आदेशानुसार वरील पाचही जणांना जिल्ह्याच्या हद्दी बाहेर जावे लागणार आहे़
परभमीतून पाच जणांच्या हद्दपारीचे काढले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:04 IST