शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या दुरुस्तीसाठी साडेसहाशे कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा खराब झाला असल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे मागील ...

जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा खराब झाला असल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे मागील अनेक वर्षांपासून कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. या कालव्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने ८ जून रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यावर जयंत पाटील यांनी आ. डॉ. पाटील यांना वरीलप्रमाणे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात दिनेश बोबडे, रवींद्र पतंगे, बाजार समितीचे संचालक तानाजी भोसले, प्रभाकर जयस्वाल, अनिल डहाळे, बाळासाहेब रसाळ, वसीक इनामदार आदींची उपस्थिती होती.

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामुळे जिल्ह्यातील ९७ हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येते. कालवा नादुरुस्त असल्याने वहन क्षमता कमी झाली आहे. या कालव्याची वहन क्षमता २१०० क्युसेस असताना केवळ ९०० ते ११०० क्षमतेने पाणी वाहते. त्यामुळे परभणी तालुक्यातील ५० टक्के गावे कालव्याच्या सिंचनापासून वंचित राहतात. या शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. परिणामी नुकसान होते. ही बाब आ. डॉ. राहुल पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली, तसेच कालव्याच्या दुरुस्तीसाठी विशेष बैठक घेण्याची मागणीही आ. डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी केली.