शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत महापालिकेने काढली अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:42 IST

महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम सुरु केली असून या अंतर्गत डनलॉप रोड, नीरज हॉटेल ते हाके मेडिकल परिसरातील अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम सुरु केली असून या अंतर्गत डनलॉप रोड, नीरज हॉटेल ते हाके मेडिकल परिसरातील अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोठ्या नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. शनिवारी नीरज हॉटेल ते हाके मेडिकल या परिसरात असलेल्या मोठ्या नाल्यातील गाळ उपसण्यात आला. सिद्धार्थनगरातील लहान-मोठ्या नाल्यांचीही सफाई करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभागांतर्गत साचलेले पाणी बाहेर काढून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नवा मोंढा परिसर, गांधी पार्क, शिवाजी चौक या भागातील रस्त्यावर साचलेला कचरा उचलण्याचे कामही सुरु असल्याची माहितीही महापालिकेने दिली. शहरातील सर्व प्रभागातील नाल्यांचीही सफाई केली जाणार आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली आहेत. या अतिक्रमणांमुळे स्वच्छतेच्या मोहिमेतही अडथळा येत असल्याने आयुक्त रमेश पवार यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निरज हॉटेल ते हाके मेडिकल आणि डनलॉप रोड भागातील अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली.प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक , अलकेश देशमुख, मुस्तदीरखान, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, शेख शादाब, नवरत्न घुगे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, शहरातील नाल्यांची सफाई आणि अतिक्रमण मोहीम हटविण्याची मोहीम सुरु राहणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.स्वच्छतेची पाहणीपरभणी: शहरात सुरु असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी करुन आयुक्त रमेश पवार यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पावसाळ्यात नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता असल्याने मनपाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची पाहणी आयुक्त पवार यांनी केली.नोटिसा देऊन जागा मोकळ्या करारस्त्याच्या कडेने अस्थाई स्वरुपात अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना तात्काळ नोटिसा देऊन जागा मोकळ्या कराव्यात, अशा सूचना आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जीर्ण असलेल्या इमारतींची पाहणी करुन इमारत मालकांना नोटिसा द्याव्यात. शहरात स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले असून स्वच्छतेची कामे करावीत, ज्या स्वच्छता निरीक्षकांनी हे काम हाती घेतले नाही, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीEnchroachmentअतिक्रमणMuncipal Corporationनगर पालिका