शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता महाबळेश्वर सोडा, परभणीला चला; पारा ५.७ अंशावर घसरला

By मारोती जुंबडे | Updated: January 9, 2023 09:24 IST

परभणी जिल्ह्यात हुडहुडी कायम; एकाच दिवसात ४ अंशांनी घसरला पारा

परभणी : जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून पाऱ्याची घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. रविवारी जिल्ह्याचा पारा ९ अंशावर होता. मात्र सोमवारी त्यात आणखीन घसरण झाली असून ५.७  अंशावर पारा आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात हुडहुडी कायम असून परभणी जिल्हा सर्वात कुल असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, परभणीकर वाढत्या थंडीने गारठल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे आता महाबळेश्वर पेक्षा परभणीचे तापमान सोमवारी गारठले आहे.

शहराचे किमान तापमान सोमवारी ५.७ एवढे नोंद झाले. रविवारी ९ अंश सेल्सिअस तर शनिवारी किमान तापमान १४ अंश एवढे होते. गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरात धूक्याची चादर दररोज सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. डिसेंबर महिन्यात १० तारखेला सर्वाधिक कमी तापमान ८.५ अंश नोंद झाले होते. त्यानंतर पुन्हा सातत्याने तापमानात वाढ झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट होत असल्याने परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे. त्यातच सोमवारी तर एकाच तापमानात ४ अंशांनी घट होऊन ५.७ अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे.

आठवडाभरात ६.८ अंशांची झाली घट डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे रब्बीतील पिकांना मोठा फटका बसला. मात्र नववर्षाच्या सुरवातीलाच जिल्ह्यातील हवेत गारवा निर्माण झाला.  सोमवार १२.५,मंगळवार १४.८,बुधवार १५.७,गुरुवार १६.२,शूक्रवार १५.३,शनिवार १४.०,रविवार ९.० होते. तर सोमवारी हेच तापमान ४अंशांनी खाली येत ५.७ अंशांवर आहे.

शेकोट्या पेटल्या जिल्ह्यात अचानक थंडीचा जोर वाढल्याने रात्रीच काय तर दिवसाही  नागरिक शेकोट्या पेटून लागले  आहेत. थंडीमुळे जागोजागी सेकोट्या पेटून नागरिकांचा घोळका तेथे जमा झाल्याचे दिसत आहे. थंडीच्या लाटेमुळे  नागरिकांची दिनचर्या बदलून गेल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान