शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सहाशे थकबाकीदारांना नोटीस

By admin | Updated: February 13, 2015 15:26 IST

महानगरपालिकेच्या कर विभागांतर्गत शहरातील सहाशे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये मनपाने मागील दोन दिवसांत जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

परभणी : महानगरपालिकेच्या कर विभागांतर्गत शहरातील सहाशे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये मनपाने मागील दोन दिवसांत जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईस प्रतिसाद देत २३ जणांनी कराची रक्कम भरल्याची माहिती कर निरीक्षक श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली.शहरातील व्यापारी संकुल, हॉटेल, महाविद्यालय, शाळा, चित्रपटगृह, मंगल कार्यालय, यासह घरगुती दुकाने, घरपट्टी, नळपट्टी थकित असणार्‍या सहाशे जणांना मागील ८ दिवसांत नोटीस देण्यात आल्या आहेत. उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील यांनी कर अधीक्षकांना सूचना देऊन ११फेब्रुवारीपासून मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार कर विभागाने ८ कर निरीक्षक, ४ वसुली अधिकारी यांचे वेगवेगळे पथक निर्माण करुन मोहिमेस सुरुवात केली आहे. दोन दिवसांत १0 लाख रुपयांची वसुली पथकाने केली आहे. यामध्ये शिवाजी चौक, नवा मोंढा, विष्णूनगर, रामकृष्णनगर व वसमतरोडवरील काही भागात मोहीम राबविण्यात आली. दोन दिवसांत राबविलेल्या मोहिमेत २३जणांनी मनपाच्या कराची रक्कम भरली आहे. ही मोहीम ३0मार्चपर्यंत रोज वेगवेगळ्या भागात राबविण्यात येणार आहे. /(प्रतिनिधी)

वारंवार सूचना, मागणी बिल, नोटीस देऊनही ज्या मालमत्ताधारकांनी थकबाकी भरलेली नाही, या मालमत्ता जप्त करण्याची मोहीम मनपाने आता हाती घेतली आहे. शहरातील मालमत्ताधारकांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी कर भरावा, असे आवाहन मनपाच्या दोन्ही उपायुक्तांनी नागरिकांना केले आहे.चित्रपटगृह, मंगल कार्यालयांना नोटीस> शहरातील सर्वच चित्रपटगृह, मंगल कार्यालय यांच्याकडे थकबाकी आहे. अशा सर्वांना मनपाने नोटीस दिल्या आहेत. यामध्ये वाढीव कराची आकारणी करुन नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे २१दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर सर्वच ठिकाणी थेट कारवई होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.