शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी तालुक्याला पाण्याचे नो टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

मागील काही वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने धरण, तलाव, नदी, नाले, ओढे या जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाण्याची साठवण ...

मागील काही वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने धरण, तलाव, नदी, नाले, ओढे या जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाण्याची साठवण होत नव्हती. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासूनच तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा जाणू लागत होत्या. त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार तयार करण्यात येत होता. परंतु, पाणीटंचाई मात्र दूर होत नव्हती. २०२०-२१ मध्ये तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यावर्षी तर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्‍यातील जलस्रोतांचा मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे तालुक्यातील १३१ गावांपैकी केवळ ५ गावात सद्यस्थितीत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यासाठी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने १० लाख रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर परभणी तालुक्यातील मोहपुरी, आळंद, तांबसवाडी, सिरसी बु व ठोळा या गावात विहीर, बोअर अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

जायकवाडी,येलदरी व निम्न दुधनाचा आधार

यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जायकवाडी,येलदरी धारण, निम्न दुधना प्रकल्प तुडुंब भरले. सध्या या धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा परभणी तालुक्यातील शेत सिंचनात सह पाणीटंचाई दूर होण्यासही मदत होत आहे .त्यामुळे हे तिन्ही धरण तालुक्यासाठी आधार मिळत असल्याचे दिसून येत आहे.