शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांच्या जेवणाचे ‘नो टेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना शासनाच्यावतीने दररोजच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. शहरात दोन ...

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना शासनाच्यावतीने दररोजच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. शहरात दोन कोविड रुग्णालयांसह अक्षता आणि रेणुका मंगल कार्यालयाच्या कोरोना केअर केंद्रांमध्ये दाखल सुमारे ७०० ते ८०० रुग्णांना दररोज कंत्राटदारामार्फत भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदारांना नियमित त्यांची बिलेही मिळत आहेत. काही ठिकाणी कंत्राटदारांची बिले रखडल्याने रुग्णांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु परभणीत मात्र नियमित बिले दिली जात असल्याची माहिती कंत्राटदाराने दिली. त्यामुळे रुग्णांच्या भोजनाचा प्रश्न मिटला आहे.

असा दिला जातो आहार

दररोज सकाळी ७ वा. चार बदाम, काढा. सकाळी ९ वा. नाश्त्यामध्ये एक अंडे, उपमा, पोहे, मटकी, इडली. सकाळी ११ वाजता चहा. दुपारी १ वाजता जेवण. (वरण, भात, भाजी, पोळी). सायंकाळी ४ वाजता : चहा आणि बिस्किट. सायंकाळी ५ वाजता : काढा, सायंकाळी ७ ते ७.३० : जेवण. रात्री ९ वाजता : हळद दूध. दर रविवारी पनीरची भाजी आणि गोड पदार्थ.

परभणी शहरातील कोरोना रुग्णांना दररोज रुचकर जेवण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रशासनाकडूनही या जेवणाची बिले वेळेच्यावेळी मिळतात. त्यामुळे कोणतीही अडचण नाही.

संपत पुरी, कंत्राटदार

अक्षता मंगल कार्यालयातील कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत आहे. या काळात प्रशासनाकडून दिले जाणारे जेवण रुचकर असते. जेवणाबद्दल कोणतीही तक्रार नाही.

कोरोनाबाधित रुग्ण

रेणुका मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. दररोज नियमित वेळेच्यावेळी जेवण आणि सकस आहार मिळत आहे. जेवणाबाबत आमची कोणतीही तक्रार नाही. रुचकर जेवण मिळत असल्याने आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.

कोरोनाबाधित रुग्ण