शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कामात निष्काळजीपणा भोवला;  साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 15:43 IST

जिंतूर येथील साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचाऱ्यांवर कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे चारठाणा येथील अनधिकृत वीज वापर प्रकरणसहा जणांची परभणी मंडळाबाहेर बदली

परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा भागात सॉ मील व पिठाच्या गिरणीत अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू असल्याप्रकरणी गिरणी चालकावर फौजदारी गुन्हा व जिंतूर येथील साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचाऱ्यांवर कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयाच्या पाच पथकांनी १० मार्च रोजी परभणी जिल्ह्यात थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची फेरतपासणी केली. यामध्ये जिंतूर येथे शाखा कार्यालयांतर्गत येणाऱ्या चारठाणा भागात सॉ मील व पिठाण्या गिरणीत अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू होता. या प्रकरणी गिरणी चालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चारठाणासह पाचलेगाव येथे अनधिकृतपणे आकडे घेऊन विजेचा वापर सुरू असल्याचे या पथकाला दिसून आले. त्यामुळे या प्रकरणी त्वरित पंचनामा न करणे, वीजपुरवठा खंडित न करणे व गुन्हा नोंद न करणे आदीबाबत महावितरणचे साहाय्यक अभियंता विनायक उत्तमराव डिग्रसकर यांना अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांनी निलंबित केले. तसेच वीजबिल वसुलीत दुर्लक्ष केल्याप्रकरणी प्रधान तंत्रज्ञ आत्माराम दत्तराव ननवरे, वरिष्ठ तंत्रज्ञ अब्दुल रहेमान अब्दुल हमीद, विद्युत साहाय्यक खुशाल ज्ञानदेव कऱ्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

सहा जणांची परभणी मंडळाबाहेर बदलीगंगाखेड, जिंतूर व बामणी येथे वीज बिलाच्या तक्रारीची दखल न घेणे, वीजबिल दुरुस्त न करणे, त्याचबरोबर प्रशासकीय कामात अनियमिततेचा ठपका ठेवून गंगाखेड ग्रामीण शाखा तंत्रज्ञ साहेबराव विनायकराव पवार, विनोद भारत गुरव, जिंतूर उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ बजरंग सखाराम साबळे, सुरेश पांडुरंग तारू, सुरेश साहेबराव खंदारे, तंत्रज्ञ नरेश बनपुरे यांची परभणी मंडळाबाहेर बदली करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाजिल्ह्यात औरंगाबाद येथील महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाकडून ग्रामीण भागात वीजपुरवठ्यासंदर्भात पाहणी करण्यात आली. याबाबत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे वीजपुरवठा सुरूच असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे काही जणांना दोषी धरून निलंबित तर काही जणांची बदली करण्यात आली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवर अधिक नियंत्रण ठेवण्याच्या सूचना परभणी येथील अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांना प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत............... 

टॅग्स :mahavitaranमहावितरणparabhaniपरभणी