शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

'नटराज' ची उघडली दारं

By admin | Updated: December 5, 2014 15:17 IST

तब्बल पाच वर्षानंतर परभणीच्या सांस्कृतिक जगताचा मानबिंदू असणार्‍या नटराज रंगमंदिराची स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने दारं उघडली.

परभणी: तब्बल पाच वर्षानंतर परभणीच्या सांस्कृतिक जगताचा मानबिंदू असणार्‍या नटराज रंगमंदिराची स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने दारं उघडली. स्थानिक कलावंत आणि महापालिका प्रशासनाने चार तास राबून रंगमंदिराच्या आतील आणि परिसरातील घाण काढली. या अभियानाची गुरूवारी दिवसभर शहरात चर्चा होती. 'नटराज'च्या पूनरुज्जीवनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अनेक कलावंतांनी तसेच नागरिकांनी 'लोकमत'चे आभार मानले. / संपूर्ण राज्यभर परभणीच्या सांस्कृतिक चळवळीचा एकेकाळी दबदबा होता. सांस्कृतिक चळवळीच्या अनेक घटनांचा व दिग्गज कलाकारांच्या पदस्पर्शाचा साक्षीदार असलेल्या नटराज रंगमंदिरची गेल्या पाच वर्षांपासून वाताहत झाली होती. महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीवर 'नटराज' चालविण्याचा खटाटोप केला. परंतु, त्यामध्ये यश आले नाही. परिणामी 'नटराज'ला कुलूप लागले. सांस्कृतिक चळवळ जीवंत राहिली पाहिजे, या भावनेतून 'लोकमत'ने गेल्या पाच दिवसांपासून 'नटराज'च्या पुरुज्जीवनासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. याला कलावंत व परभणीकर भरभरुन प्रतिसाद देत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, मनपा प्रशासन, पदाधिकारी आदींना निवेदन दिल्यानंतर आंदोलनाचाही इशारा कलावंतांनी दिला. तरीही उपयोग झाला नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागेवर आणण्यासाठी ४ डिसेंबर रोजी 'नटराज' व परिसराची साफसफाई करण्याचा निर्णय कलावंतांनी घेतला. त्यानुसार गुरुवारी सकाळीच ६ वाजेपासूनच नटराज रंगमंदिर परिसरात कलावंत जमू लागले. अध्र्या तासात जवळपास २५ कलावंत आणि ५0 नागरिक जमा झाले आणि 'नटराज'च्या साफसफाईला सुरुवात झाली. 'नटराज'चे कुलूप उघडताच समोरील दृश्य पाहून कलावंत स्तब्ध झाले. याच व्यासपीठाने मान, सन्मान दिला. चांगल्या कलेची दाद देत हजारो टाळ्यांचा वर्षाव झाला. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात वेगळा ठसा उमठविणार्‍या कलाकारांनीही येथे कला सादर केल्या. त्याच व्यासपीठाची दयनीय अवस्था पाहून कलावंतांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर स्वत:हून साफसफाईची सुरुवात करण्यात आली. काही कलावंतांनी रंगमंदिरासमोर पथनाट्य सादर करुन आपला रोष व्यक्त केला. सकाळी ८ वाजेच्या सुमारास उपमहापौर भगवान वाघमारे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कलाकारांशी संवाद साधला. नटराज पुरुज्जीवन करण्याचे आश्‍वासन दिले व स्वत:ही वाघमारे स्वच्छता अभियानात उतरले. त्यांच्यासोबत कलावंत प्रा.रविशंकर झिंगरे, किशोर पुराणिक, बालनाथ देशपांडे, मिलिंद साळवी, कुमार पुराणिक, प्रमोद बल्लाळ, मधुकर उमरीकर, सुनील ढवळे, विनोद डावरे, अनुजा डावरे, प्रशांत पिंपरकर, अभय कुलकर्णी, उपेंद्र दुधगावकर, प्रकाश बारबिंड, नागेश कुलकर्णी, त्र्यंबक वडसकर, अरुण हिस्वनकर, संजय पांडे, डिगांबर दिवाण, राजेश शेलार, दिनकर देशपांडे यांनीही सफाई मोहितेत सहभाग घेतला. यावेळी मनपा उपायुक्त रणजीत पाटील, राजेंद्र वडकर, सुशिल नर्सीकर, सय्यद इम्रान, प्रकाश कुलकर्णी, मीर शाकेर अली, मालमत्ता व्यवस्थापक मुकूंद मस्के, कर अधीक्षक श्रीपाद कुलकर्णी, गजानन जाधव, रईस खान, अशोक स्वामी, मेहराज अहेमद, गणेश लहाने, सुनील वसमतकर, गंधम हे ही उपस्थित होते. 
दरम्यान, उपायुक्त रणजीत पाटील यांनी या प्रसंगी कलावंतांनी संयम आणि सहकार्याची भूमिका घ्यावी. संघर्ष समिती स्थापन करावी, मनपाचे एक कार्यालय या ठिकाणी सुरु करु, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे पाटील यांच्याकडून कलावंतांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण होतात की, फोल ठरतात, याकडे जिल्ह्यातील सर्व कलावंतांचे लक्ष लागले आहे.