लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षात डी. लिट ही मानद पदवी त्यांना देण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. याच अनुषंगाने परभणी येथे नवीन नाट्यगृहाची उभारणी होत असून, या नाट्यगृहाला वामनदादा कर्डक यांचे नाव द्यावे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यशवंत मकरंद यांनी प्रास्ताविक केले. भीमप्रकाश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. पंकज खेडकर यांनी आभार मानले. बैठकीस प्रा. डॉ. सुरेश शेळके, पंडित टोमके, सुनील ढवळे, चंद्रकांत लहाने, दिलीप साळवे, गोपीनाथ कांबळे, रवि पंडित, संजीव अढागळे, बाबूराव केळकर, मिलिंद साळवे, करण गायकवाड, समाधान मनवर, सिद्धार्थ मस्के, अमोल गायकवाड, गौतम भराडे, प्रदीप वाव्हळे, द्वारकाबाई गंडले, अर्जुन पंडित, संघपाल अढागळे, आशिष वाकोडे आदींची उपस्थिती होती.
नाट्यगृहास वामनदादा कर्डक यांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST