परभणी शहरालगत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ अंतर्गत परभणी ते आसोला या बाहयवळण रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. संजय जाधव व आ.डॉ.राहुल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बाह्यवळण रस्त्यासाठी माजी महापौर प्रताप देशमुख यांनीही शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. नगराध्यक्षपदाच्या काळात प्रताप देशमुख यांनी या बाह्यवळण रस्त्यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. बाह्यवळण रस्त्यासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना जमीनीपोटी मावेजासाठी २९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. त्यामुळे संपादीत जमीनीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांच्या वतीने माजी महापौर प्रताप देशमुख यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांचा सत्कार केला.
मावेजा मिळाल्याबद्दल मुगळीकर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST