शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील बहुचर्चित रस्ता:अंदाजपत्रकास बगल देऊन रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:52 IST

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद दरम्यानच्या रस्त्याचे काम मूळ अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने सुरु असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल १७ महिन्यांपासून सुरु असलेल्या या रस्ता कामात आता दुभाजकाऐवजी जाळ्या बसविण्याची तयारी मनपाने सुरु केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद दरम्यानच्या रस्त्याचे काम मूळ अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने सुरु असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल १७ महिन्यांपासून सुरु असलेल्या या रस्ता कामात आता दुभाजकाऐवजी जाळ्या बसविण्याची तयारी मनपाने सुरु केली आहे.परभणी शहरातील प्रमुख रस्ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या निकषाप्रमाणे व्हावेत, यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद चार वर्षापूर्वी करण्यात आली होती. यामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद या रस्त्याचा समावेश आहे. तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध करुन दिला असतानाही रस्ता कामाच्या मूळ अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने काम करण्याचा प्रकार सातत्याने सदरील कंत्राटदाराकडून सुरु आहे. प्रारंभी वर्षभरात हे काम पुर्ण होणे आवश्यक होते; परंतु, तब्बल १७ महिन्यांपासून हे काम सुरुच आहे. सदरील कंत्राटदाराला दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला होता; परंतु, नंतर मनपाने हा निर्णय थंडबस्त्यात टाकून दिला. तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी या रस्ताकामाकडे वैयक्तिक लक्ष दिले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा फुले यांच्या नियोजित पुतळ्यापर्यंतचे काम चांगल्या दर्जाचे झाले. या कामाची नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांनी वेळोवेळी तपासणी केल्याने कामाचा चांगला दर्जा टिकून राहिला; परंतु, रेखावार यांची बदली झाली आणि या रस्ता कामातील मनमानीला सुरुवात झाली. महात्मा फुले यांचा नियोजित पुतळा ते शाही मशीद या दरम्यानच्या रस्त्याचे काम वेगाने करण्यात आले. तज्ज्ञांच्या तपासणीला खो देण्यात आला व हे काम उरकून घेण्यात आले. आता पुन्हा एकदा या रस्त्याच्या कामात मनमानी सुरु आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्याची मूळ अंदाजपत्रकात तरतूद होती; परंतु, या रस्त्याच्या प्रारंभापासून दुभाजकाऐवजी लोखंडी जाळ्या टाकून त्यामध्ये शोभेची झाडे लावण्याचा खटाटोप मनपाकडून सुरु आहे. सदरील जाळ्या तकलादू असणार आहेत. शिवाय मूळ अंदाजपत्रकात याचा कुठेही समावेश नव्हता. तरीही कमी खर्चाची ही आयडिया मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजूर केली. त्यामुळे कंत्राटदाराचे फावल्याचे दिसून येत आहे.गेल्या दोन दिवसांपासून दुभाजकादरम्यान लोखंडी अ‍ँगल उभे करुन फरशीच्या आधारावर (कंत्राटदाराकडे सेंट्रींगचे साहित्य उपलब्ध नाही) कठडे तयार केले जात आहेत. त्यानंतर येथे माती आणून त्यामध्ये कन्हेरीची झाडे लावण्यात येणार आहेत.लोकप्रतिनिधीही मनपास जाब विचारेनात४मनमानी पद्धतीने अंदाजपत्रकाला खो देऊन रस्त्याचे काम केले जात असताना मनपातील विरोधी नगरसेवक मूग गिळून गप्प आहेत. शिवाय अन्य लोकप्रतिनिधीही याबाबतचा जाब मनपाला विचारण्यास तयार नाहीत. सत्ताधारी नगरसेवक किंवा पदाधिकारीही याबाबतचा जाब प्रशासन किंवा कंत्राटदारास विचारत नाहीत. त्यामुळे कंत्राटदाराकडून बिनदिक्कतपणे हे काम सुरु आहे. शिवाय या रस्त्याच्या बाजुला तयार केलेल्या नाल्यांवर कोठे ढापे टाकले आहेत तर कुठे टाकलेले नाहीत.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका