शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत वेतनासाठी मनपाचे सफाई कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:18 IST

तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी १० एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी १० एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत.१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. विशेष म्हणजे वेतनाच्या मागणीसाठी ३ एप्रिल रोजी संघटनेचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकाºयांमध्ये चर्चा झाली. अधिकाºयांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासनही दिले; परंतु, अद्यापपर्यंत मागण्यांची पुर्तता झाली नाही. सणासुदीच्या काळात वेतन नसल्याने कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कर्मचाºयांच्या इतर मागण्याही प्रलंबित असल्याने स्वच्छता विभागातील कायम व रोजंदारी कामगारांनी १० एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. येथील महापालिकेच्या कार्यालयात स्वच्छता कर्मचाºयांनी ठिय्या मांडून वेतनाची मागणी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कामगारांनी बोलून दाखविला. कायम व रोजंदारी सफाई कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन अदा करावे, सफाई कामगारांना १२ व २४ वर्षांच्या पदोन्नतीसाठी जात पडताळणीची अट रद्द करावी, रोजंदारी कामगारांना विना अट सेवेत कायम करावे, सफाई कामगारांना आकृतीबंधानुसार सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक पात्रतेनुसार मुकादम, शिपाई, वाहन चालक, लिपीक पदावर पदोन्नती द्यावी, दुसºया व चौथ्या शनिवारी सुटी द्यावी, कामगारांना घरे बांधून द्यावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. परभणी शहर महानगरपालिका सफाई कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के.के. भारसाखळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका