शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

५ नोव्हेंबर रोजी महापौरांची निवड

By admin | Updated: October 22, 2014 13:28 IST

परभणी महानगरपालिकेच्या महापौरांची ५ नोव्हेंबर रोजी निवड होणार असून या संदर्भातील शासनाचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिली.

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौरांची ५ नोव्हेंबर रोजी निवड होणार असून या संदर्भातील शासनाचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिली.

परभणी महानगरपालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षासाठी ओबीसी महिलासाठी राखीव झाले आहे. या संदर्भात मुंबई येथे १६ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर आता महापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ५ नोव्हेंबर रोजी महापौरांची निवड होणार आहे. परभणी महानगरपालिकेत ६५ सदस्य संख्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ३0, काँग्रेसचे २३, शिवसेनेचे ८, भाजपाचे २ आणि अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. महानगरपालिकेत काँग्रेस हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. महापौर प्रताप देशमुख यांचा कार्यकाळ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे, त्यामुळे नव्या महापौरांची निवड ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय खेळींच्या पार्श्‍वभूमीवर होणारी महापौरांची निवड महत्त्वपूर्ण राहणार आहे. नूतन महापौर निवडीत राष्ट्रवादी काँग्रेेसकडून महापौर प्रताप देशमुख हेच किंगमेकर राहणार आहेत. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसले तरी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने महापालिकेत काही चमत्कार घडतो का?अशी चर्चा सुरु झाली आहे. वरपूडकर यांना मानणारा राष्ट्रवादीत नगरसेवकांचा एक गट आहे. शिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्षसुरेश देशमुख यांचीही भूमिका या प्रकरणी महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे./ राष्ट्रवादीकडून सात तर काँग्रेसकडून दोन दावेदार
४/महापौरपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे या पदासाठी ७ दावेदार आहेत. तर काँग्रेसकडे स्वाती खताळ व संगीता मुळे या दोन नगरसेविका दावेदार आहेत. 
/(वार्ताहर)