शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'मग आम्हाला बोलावले कशाला'; मंत्री अतुल सावेंना विचारला स्वातंत्र्यसैनिकाने जाब

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 17, 2022 17:43 IST

marathawada muktisangram din: परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली.

परभणी : आम्ही जिवाचे रान करून मराठवाड्याला निजामापासून मुक्त केले. गुलामगिरी काय असते, याची कल्पना आपणास येणार नाही. त्यामुळे तुमच्यासह इतर नागरिक जे स्वातंत्र्य उपभोगत आहेत, ते आमच्या सारख्या अनेकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच. पण आज सरकार, प्रशासन आमचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी कमी पडत असल्याची खंत स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी मंत्री अतुल सावे यांच्याकडे व्यक्त करत त्यांना याबाबत जाब विचारला. परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या (marathawada muktisangram din) पार्श्वभूमीवर झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यसैनिकाने आपली खदखद मंत्री सावे यांच्यासह इतरांकडे बोलून दाखवली.

परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी आपल्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या. आजचे प्रश्न, सुविधा, योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आमचे प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. घरासह वैयक्तिक योजनेच्या अनुषंगाने आमच्या सोबत दुजाभाव होतो, असा आरोप लक्ष्मण मकरंद यांनी केला. आता बोटावर माेजण्या इतकेच स्वातंत्र्यसैनिक हयात आहे, किमान त्यांचे प्रश्न तरी सरकारने तातडीने साेडवावे, अशी अपेक्षा त्यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली.

मग आम्हाला बोलावले कशालापरभणीत झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान वीरपत्नी आणि मातांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायास अश्रूंच्या रुपाने वाट मोकळी करून दिली. आमच्या परिवारातील सदस्यांनी जिवाची बाजी लावत देश रक्षणासाठी आत्मबलिदान दिले. पण अशा शासकीय कार्यक्रमादरम्यान आम्हाला योग्य तो मान, सन्मान मिळत नाही, मग बोलवता कशाला, अशी खंत शहीद अक्षय यांची आई सुनीता गोडबोले, वीर पत्नी अनुराधा गणेश शहाणे, वीरपत्नी अंजना बालाजी अंभोरे यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली. या कार्यक्रमातही मंत्री सावे संबंधितांना न भेटता निघाले हाेते. पण अनिता सरोदे यांनी संबंधितांची भेट मंत्री सावे यांच्याशी घालून दिली. कुठल्याही कार्यक्रमात आमच्यासोबत असेच होत असल्याचा आरोप यावेळी वीर माता, वीर पत्नी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेparabhaniपरभणी