शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मानवत तालुक्यात निराधारांचा तपासणी अहवाल रखडला; अनुदानासाठी पहावी लागतेय वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 19:52 IST

तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची तलाठ्यामार्फत सुक्ष्म तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा अहवाल तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याने निराधारांचे अनुदान वाटप रखडले आहे. 

ठळक मुद्देसामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेसाठी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यानी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. यातील १ हजार ८७ अर्ज निकाली काढण्यासाठी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी बैठक घेण्यात आली होती. 

मानवत (परभणी ) : येथील तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची तलाठ्यामार्फत सुक्ष्म तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा अहवाल तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याने निराधारांचे अनुदान वाटप रखडले आहे. 

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना या दोन राज्य शासनाच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या योजनेचा समावेश आहे. यातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपयांचे मानधन दिले जाते. या योजनेसाठी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यानी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. यातील १ हजार ८७ अर्ज निकाली काढण्यासाठी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी बैठक घेण्यात आली होती. 

बैठकीत तहसीलदार अश्विनी जाधव यांनी ३६६ अर्ज मंूजर केले होते. तर या बैठकीत ७१५ अर्ज नामंजूर करण्यात आले होते. बैठकीत मंजूर केलेल्या पात्र लाभार्थ्यांची सुक्ष्म तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार जाधव यांनी २७ नोव्हेंबर रोजी दिले होते. तलाठ्यांमार्फत ही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाभार्थी मयत झाला आहे का? मुले नोकरीला आहेत का? लाभार्थी स्थलांतरित आहे का? त्यांचा आर्थिक स्तर आदींची तपासणी करण्यात येणार होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी केवळ दहा गावांतील २५१ लाभार्थ्यांचे अहवाल कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. इतर लाभार्थ्यांचे अहवाल मात्र आले नाहीत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. उर्वरित गावातील अहवाल सादर करण्यास विलंब करणार्‍या तलाठ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निराधारांमधून केली जात आहे. 

बोंडअळी सर्व्हेक्षणाचा अडथळामानवत तालुक्यातील ३६६ निराधार लाभार्थ्यांच्या सुक्ष्म तपासणीचे आदेश काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यामध्ये मानवत, रामेटाकळी, उक्कलगाव, केकरजवळा, सावळी, भोसा, वझूर, सावरगाव, पाळोदी, रुढी या १० गावातील २५१ लाभार्थ्यांचे तपासणी अहवाल तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. उर्वरित ४४ गावातील १०५ लाभार्थ्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. याच काळात बोंडअळीग्रस्त कापसाच्या सर्वेक्षणाचे कामही तलाठी कर्मचार्‍यांना करावे लागले. या सर्वेक्षणामुळेच अहवाल सादर करण्यास विलंब झाल्याचे कर्मचार्‍यांतून बोलल्या जात आहे. याचा त्रास मात्र निराधार लाभार्थ्यांना होत आहे. 

तलाठ्यांना सूचना दिल्या आहेतमानवत येथील तहसील कार्यालयास तालुक्यातील काही निराधार लाभार्थ्यांचे सुक्ष्म तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित निराधार लाभार्थ्यांचे तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना तलाठ्यांना दिल्या आहेत. - अश्विनी जाधव, तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणी