शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गॅसच्या नळीने अचानक पेट घेतल्याने महिला भाजली, घराचे लाखोचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 18:00 IST

बोरी (जि. परभणी), दि. २६ :  गॅस सिलेंडरची नळी अचानक लिक झाल्याने घराला आग लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची ...

बोरी (जि. परभणी), दि. २६ :  गॅस सिलेंडरची नळी अचानक लिक झाल्याने घराला आग लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना  सकाळी १० च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील करवली येथे घडली आहे. यामध्ये घराचेही जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

जिंतूर तालुक्यातील करवली येथील श्यामराव गोरे यांची पत्नी निलावंती गोरे आज सकाळी १० च्या सुमारास घरी स्वयंपाक करीत असताना गॅसची नळी लिकेज झाली. यातून बाहेर पडणा-या गॅसने लागलीच आग पकडली. आग क्षणार्धात वाढत जाऊन संपूर्ण घराला वेढा घातला. याचवेळी आग लागल्याची माहिती मिळताच सरपंच जगन्नाथ चोपडे, उत्तम डोंबे, पंडीतराव घाटूळ, आशाताई गायकवाड, पंडीतराव घोलप, रफीक भाई, मनोज शिंपले आदीनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून जिंतूर येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर अग्नीशमन दल व ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. 

दरम्यान, आग लागल्याने निलावती गोरे या जखमी झाल्या असून त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आगीमध्ये संसारोपयोगी साहित्यासह रोख ३० हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने  असा १ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. या घटनेचा पंचनामा तलाठी नितीन बुड्डे यांनी केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल, एलपीजी गॅसचे कुणाल जैस्वाल आदींची उपस्थिती होती.