शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अजीवन कारवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 18:43 IST

सुधारित कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा दाखल होता

परभणी : आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपी सय्यद बबलू सय्यद अशरफ (रा.कानडखेड,ता.पूर्णा) यास अजीवन कारावासाची शिक्षा परभणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांनी सुनावली आहे. २० मार्च रोजी हा निकाल देण्यात आला.

सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार १८ एप्रिल २०१८ रोजी पीडीत मुलीचे आई-वडिल गांधी पार्क परिसरातील सागर एम्पोरियम या दुकानात खरेदी करीत होते. त्यावेळी पीडित मुलगी ही आरोपी सय्यद बबलू सय्यद आशफाक याच्यासोबत होती. तेथूनच आरोपीने ८ वर्षांच्या पीडित मुलीस पळवून नेले. पूर्णा तालुक्यातील अजदापूर येथील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक प्रणिता बाभळे यांनी घटनेचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे २० साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी- फलके यांनी आरोपी सय्यद बबलू यास दोषी ठरवत अजीवन कारवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३६३ अन्वये ३ वर्षे कारवास व १० हजार रुपये दंड, कलम ३६६-अ नुसार ३ वर्षे कारवास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांचे सहकार्य लाभले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील मिलिंद गाजरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

सुधारित कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हापोस्कोच्या सुधारित कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पीडित मुलगी ही ८ वर्षांची होती व या प्रकरणात वैद्यकीय पुरावा, डी.एन.ए. अहवाल, सी.सी.टी.व्ही. फुटेज व परिस्थितीजन्य पुरावा या आधारे डी.एन.ए. व वैद्यकीय पुरावा हा एकमेकांशी सुसंगत असून, त्यास न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीला शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपRapeबलात्कारparabhaniपरभणी