शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

कुंजबिहारी हॉटेलला सील

By admin | Updated: January 30, 2015 14:44 IST

स्टेशनरोड परिसरातील कुंजबिहारी हॉटेलला २९ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या एका संयुक्त कारवाईत सील ठोकण्यात आले. शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात कुंजबिहारी हॉटेल आहे.

परभणी : स्टेशनरोड परिसरातील कुंजबिहारी हॉटेलला २९ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या एका संयुक्त कारवाईत सील ठोकण्यात आले. शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात कुंजबिहारी हॉटेल आहे. या हॉटेलमधील अन्न नमुने तसेच परवान्यांसंदर्भात तपासणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाचे पथक दाखल झाले. पोलिस कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तासाठी हे पथक हॉटेलमध्ये तपासणी करीत असल्याने नेमकी काय कारवाई आहे, या संदर्भात परिसरात तर्क-वितर्क लढविण्यात येत होते. कारवाई दरम्यान परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने हॉटेलमधील अन्न नमुने, स्वच्छता, पाण्याची तपासणी आदी विषयीची पाहणी करण्यात आली. त्याच प्रमाणे तहसील कार्यालयाच्या पथकाने हॉटेल व्यवसायाचा परवाना, अन्न परवाना आदी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात किती परवान्यांचे नुतनीकरणाचीही माहिती पथकाने घेतली. महानगरपालिकेच्या वतीनेही या मोहिमेत सहभाग घेण्यात आला. दरम्यान, कुंजबिहारी हॉटेल, लॉजिंग व कुंजबिहारी स्नॅक्स असे प्रतिष्ठान या ठिकाणी आहे.दुपारी १२ वाजेच्या सुमारास या कारवाईला प्रारंभ झाला. दोन ते अडीच तासांच्या कारवाईनंतर अडीच वाजेच्या सुमारास कुंजबिहारी हॉटेल आणि कुंजबिहारी स्नॅक्स या दोन्ही प्रतिष्ठांना सील ठोकण्यात आले. उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार संतोष रुईकर, मंडळ अधिकारी जीवन कुलकर्णी, शेख वसीम हे महसूलचे कर्मचारी तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्न निरीक्षक सुनील जिंतूरकर, आर. डी. कोकडवार, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रकाश कुलकर्णी, सय्यद इम्रान, प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, राजू झोडपे आदींनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांच्यासह नवा मोंढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडगे, पोलिस उपनिरीक्षक कापुरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. /(प्रतिनिधी) 

जिल्हाधिकारी कार्यालयातून हॉटेल व्यवसायासाठी खाद्य परवाना दिला जातो. कुंजबिहारी हॉटेलच्या मालकाकडे खाद्य परवाना उपलब्ध होता. परंतु, १९९८ पासून परवान्याचे नुतनीकरण नव्हते. तसेच या हॉटेलच्या शेजारीच असलेल्या कुंजबिहारी स्नॅक्स यांच्याकडे कुठलाही परवाना नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या सूचनेनुसार सील ठोकल्याची माहिती तहसीलदार संतोष रुईकर यांनी दिली.