शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जंबो कोविड सेंटरच्या खाटा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

परभणी : येत्या आठ दिवसांत शहरातील मनपाच्या कल्याण मंडपम् सभागृहात ५०० खाटांचे जंबो कोविड सेंटर उभारण्याची पालकमंत्री नवाब मलिक ...

परभणी : येत्या आठ दिवसांत शहरातील मनपाच्या कल्याण मंडपम् सभागृहात ५०० खाटांचे जंबो कोविड सेंटर उभारण्याची पालकमंत्री नवाब मलिक यांनी केलेली घोषणा हवेतच विरली असून, उद्घाटनाच्या वेळी आणलेल्या खाटा आता गायब झाल्या आहेत. त्यामुळे या केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे.

जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत २६ हजार ८८७ रुग्णांची वाढ झाली असून, उपचारांदरम्यान ५४७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाभरातील परिस्थिती गंभीर असल्याने २२ एप्रिलला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री नवाब मलिक यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा कचेरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत परभणी शहरातील मनपाच्या कल्याण मंडपम् येथील सभागृहात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर आठ दिवसांत उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कोविड सेंटरचे उद्घाटनही पालकमंत्री मलिक यांच्या हस्ते पार पडले होते. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू असल्याचा अनुभव तिसऱ्याच दिवशी आला होता. नंतरच्या काळात मात्र पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि अचानक उद्घाटनाच्या वेळी आणलेल्या खाटा वाहनात टाकून रातोरात नेण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास या कोविड सेंटरला या प्रतिनिधीने भेट देऊन पाहणी केली असता, कल्याण मंडपम् सभागृहात शुकशुकाट दिसून आला. येथील सर्व खाटा गायब होत्या. काही दिवसांपूर्वी पार्टीशयनचे काम करणारे कर्मचारीही गायब होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आठ दिवसांत कोविड सेंटर उभारण्याची केलेली घोषणा हवेतच विरल्याचा प्रत्यय अनुभवयास आला. विशेष म्हणजे पालकमंत्री नवाब मलिक हे १ मे रोजी पुन्हा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आता त्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे येथे कोविड सेंटरची उभारणी का झाली नाही? याचे उत्तर मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, या संदर्भात मनपा आयुक्त देविदास पवार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, बराच वेळ फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कल्याण मंडपम् येथील कोविड सेंटरला ऑक्सिजनची लाईन असल्याशिवाय सुरुवात करता येत नाही. दोन दिवसांत ही लाईन टाकून ऑक्सिजनच्या १०० बेडची व्यवस्था येथे केली जाणार आहे. उर्वरित सर्वसाधारण बेड राहणार आहेत. येथे आणलेल्या खाटा व्यवस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या संबंधित कंत्राटदाराला परत केल्या आहेत.

दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

पालकमंत्र्यांनी केले होते उद्घाटन

कोविड केअर सेंटरची उभारणी न करताच अर्ध्या दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी घाईघाईत कल्याण मंडपम् येथील ५०० खाटांच्या कोविड सेंटरचे उद्घाटन २२ एप्रिल रोजी केले होते. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. गेल्या आठ दिवसांत कोविड केअर सेंटर का कार्यान्वित झाले नाही, याचा जाब मात्र या नेतेमंडळींनी प्रशासनास विचारलेला नाही.