शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींच्या योजनांत अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:13 IST

राष्टÑीय पेयजल व भारत निर्माण योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३ कोटी १३ लाख ७६ हजार ८७५ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये अनियमितता झाली असून, त्यातील ४५ लाख ९९ हजार ३३८ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात येऊनही केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत असल्याचा प्रकार समोर आला आहे़

विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : राष्टÑीय पेयजल व भारत निर्माण योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३ कोटी १३ लाख ७६ हजार ८७५ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये अनियमितता झाली असून, त्यातील ४५ लाख ९९ हजार ३३८ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात येऊनही केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत असल्याचा प्रकार समोर आला आहे़जिंतूर तालुक्यात भारत निर्माण योजनेंर्गत २००६ ते ०७ या वर्षापासून लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेची कामे प्रशासकीय पातळीवर हाती घेण्यात आली होती. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे़ त्यामुळे या योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तालुक्यातील शेवडी येथे २००६-०७ या वर्षी योजनेचे काम हाती घेण्यात आले. परंतु, २३ लाख ९९ हजार ३०० रुपयांच्या या योजनेत पाणीपुरवठा समितीने १६ लाख रुपये उचलले. यामध्ये जवळपास ४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला. यातील वसुलीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने समिती सदस्यांच्या सातबारावर बोजा टाकण्याचा प्रस्ताव महसूल प्रशासनाकडे पाठविला. मात्र महसूल विभागाने सचिवाच्याच सातबारावर बोजा टाकला असून, अध्यक्षांना अभय देण्यात आले आहे़ पोखर्णी तांडा येथील २२ लाख ७४ हजार ६०० रुपयांच्या योजनेत ७ लाख ३६ हजारांचा गैरव्यवहार झाला आहे़. सोरजा येथे १४ लाख २१ हजार ५५० रुपयांच्या योजनेत ६ लाख ५४ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे़ तसेच कडसावंगी येथील १४ लाख ३० हजार ७३९ रुपयांच्या योजनेत ४ लाख ९४ हजारांचा गैरव्यवहार झाला आहे. रायखेडा येथे २० लाख ५१ हजार २५० रुपये आणि १६ लाख ७४ हजार रुपयांच्या योजनेत गैरव्यवहार झाला असून, त्यातील ६ लाख २७ हजार रुपयांची वसुली करण्याचे निश्चित करण्यात आले होते़नागठाणा येथील १५ लाख ४७ हजार ८०० रुपये व १२ लाख १६ हजार १२३ रुपयांच्या योजनेत अनियमितता झाली असून, यातील ५ लाख ५३ हजार तर डिग्रस येथील १६ लाख ३४ हजार २९० आणि २६ हजार ३८ हजार ३०० रुपयांच्या योजनेत १ लाख रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते़ मानकेश्वर (चारठाणा) येथील १६ लाख ७३ हजार ५० व १६ लाख ५३ हजार १५८ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत अनियमितता झाली असून, त्यातील २ लाख २५ हजार रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते़ बोर्डी येथील १७ लाख ११ हजार १०० व २५ लाख ७५ हजार ७४६ रुपयांच्या आणि सायखेडा येथील १९ लाख ४६ हजार ७८३ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये अनियमितता झाली़ तसेच डोहरा येथील ३६ लाख ८९ हजार ८६ रुपयांच्या पाणीपुरठा योजनेत अनियमितता झाली़ त्यातील ८ लाख १९ हजार ३३८ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते़ एकूण ११ योजनांच्या कामांमधील ४५ लाख ९९ हजार ३३८ रुपयांची वसुली करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला लेखा परिक्षणातून देण्यात आले होते़ परंतु, ही वसुली केली गेली नाही़या प्रकरणी काही ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर रकमेच्या वसुलीसाठी समिती अध्यक्ष व सचिव यांच्या सातबारावर बोजा टाकण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दीड वर्षापूर्वी महसूल प्रशासनाला प्रस्ताव पाठविले होते. मात्र कारवाई करण्यासंदर्भात महसूल प्रशासन वेळकाढू भूमिका घेत आहे. त्यामुळे हे प्रस्ताव दीड वर्षापासून धूळखात पडून आहेत. या संदर्भातील प्रश्न मार्च महिन्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता़ त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसुकर व महसूल यंत्रणेला दिले होते़ परंतु, गेल्या आठ महिन्यांपासूनही या संदर्भात काहीही कारवाई झालेली नाही़ त्यामुळे कोणाला वाचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़