जिंतूर : शहरी भागात असणारा कोरोना आता ग्रामीण भागातही फोफावत असून ३० ते ३५ टक्के रुग्ण संख्या ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे सर्वांनी आता काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.
जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १०० खाटांच्या कोविड सेंटरचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री नवाब मलिक यांनी या कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन पद्धतीने उदघाटन केले. त्यावेळी राज्याचे पणन संचालक सतीश सोनी ,विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे हे ऑनलाईन उपस्थित होते. त्यानंतर कार्यक्रम ठिकाणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आ. विजय भांबळे होते. या कार्यक्रमाचे वेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे, पोलीस विभागीय अधिकारी श्रवण दत्त, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षाताई भांबळे, नगराध्यक्षा सबिया बेगम फारुकी, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, नगर परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समितीचे मुख्य प्रशासक मनोज थिटे, सचिव एस.बी .काळे, बाजार समितीचे प्रशासक सर्व रुपेश चिद्रवार, प्रभाकर चव्हाण, दिलीप घनसावंत, कैलास सांगळे, शंकर जाधव, हनुमंत भालेराव, जगदीश शेंद्रे, तसेच बाजार समितीचे सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल देशमुख यांनी केले.