कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकूण ३ हजार ९७६ खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यापैकी १ हजार ४४२ खाटांवर रुग्ण उपचार घेत असून, २ हजार ५३४ खाटा कोरोना केअर सेंटर आणि कोरोना रुग्णालयांमध्ये रिक्त आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. महिनाभरापूर्वी ऑक्सिजन खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आता ऑक्सिजन खाटाही मोठ्या प्रमाणात रिक्त होत आहेत. जिल्ह्यात ४९७ ऑक्सिजन खाटांची सुविधा उपलब्ध केली आहेत. त्यापैकी ३२३ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या १७४ खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली. परभणी जिल्ह्यातील आयसीयूमध्ये ५०८ खाटांची सुविधा करण्यात आली आहे. त्यात २३५ ऑक्सिजन खाटा आणि ५१ व्हेंटिलेटरसह खाटांची सुविधा करण्यात आली आहे. त्यापैकी २२२ खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ऑक्सिजनच्या रिक्त खाटांची वाढली संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST