रस्त्यालगतचे ढिगारे पांगवणार कधी?
देवगावफाटा : सेलू-देवगावफाटा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होऊन ४ महिने उलटले. पण साईडपट्टया भरण झाले नव्हते. याबाबत लोकमतने पाठपुरावा केल्यानंतर संबंधित गुत्तेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुमाचे ढिगारे टाकून १ महिना होत आहे. पण या ढिगाऱ्याला पांगवण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न आहे. या ढिगाऱ्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
मंगल कार्यालय चालकांना फटका
देवगावफाटा : कोरोना लाॅकडाऊनमध्ये मंगल कार्यालय चालकांनी आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये शहरातील मंगल कार्यालय कार्यक्रमाअभावी बंद आहेत. परिणामी, या मंगल कार्यालयाशी सलग्न असणारे इतर व्यावसायिकही आर्थिक संकटात आहेत. हे व्यावसायिक लाॅकडाऊन कधी संपणार, याकडे लक्ष ठेवून आहेत.
रमाजानमुळे फळांची विक्री वाढली
देवगावफाटा : सध्या रमजानचा महिना चालू असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हाचा त्रास कमी होऊन पोटाला थंडावा मिळावा यासाठी उपवास सोडताना टरबूज, खरबुज, शेफ, चिकूसह इतर फळांची विक्री वाढत आहे.
देवगावफाटा-सेलू रस्त्यावर मोरेगाव दुधना नदीवरील अरुंद पुलाच्या बाजूला काटेरी झुडुपे रस्त्यावर आल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.