शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

परभणी शहरात मास्कला वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:53 IST

चीनसह इतर देशांमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना या आजाराची धास्ती परभणीकरांनीही घेतली असून, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवडाभरापासून मास्कचा वापर वाढला आहे़ शहरात दिवसाकाठी साधारणत: १५० मास्क विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चीनसह इतर देशांमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना या आजाराची धास्ती परभणीकरांनीही घेतली असून, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवडाभरापासून मास्कचा वापर वाढला आहे़ शहरात दिवसाकाठी साधारणत: १५० मास्क विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली़दोन महिन्यांपासून कोरोना या संसर्गजन्य आजाराविषयी जनगभरात धास्ती निर्माण झाली आहे़ चिनसह इतर अनेक देशांमध्ये पसरलेल्या या आजाराचे संशयित रुग्ण भारतातही आढळल्याचे वृत्त दोन-तीन दिवसांपासून चर्चेत येत असल्याने परभणीसारख्या ठिकाणीही नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे़ महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू केल्यानंतर या संदर्भात खऱ्या अर्थाने जनजागृती होत असून, कोरोनासह इतर संसर्ग आजाराचा प्रसार होवू नये, या उद्देशाने नागरिकच स्वत:हून काळजी घेऊ लागले आहेत़ त्यातच परभणी जिल्ह्याच्या शेजारी असणाºया बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला़ परभणी जिल्ह्यातून या यात्रेला हजारो भाविक जात असतात़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आल्याने नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्यास सुरुवात केली आहे़ गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले जात आहे़ नाईलाजाने गर्दीच्या ठिकाणी जावेच लागले तर मास्कचा वापर सुरू झाला आहे़जिल्ह्यात सर्वसाधारणपणे मास्क वापरले जात नाहीत़ त्यामुळे आतापर्यंत मागणी नसणाºया मास्कला आठवडाभरापासून चांगलीच मागणी वाढली आहे़ सार्वजनिक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावरील औषधी दुकानांवर दिवसाकाठी १५ ते २० मास्क विक्री होत आहेत़ शहरामध्ये १०० ते १५० औषधी दुकाने असून, या दुकानावरुन सरासरी १५० मास्क दररोज विक्री होत आहेत़ युज अँड थ्रो किंवा जास्तीत जास्त एक दिवस वापरता येतील, असे हे मास्क असून, त्याची विक्री वाढली आहे़ शहरामध्ये धुळीचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे संसर्गजन्य आजारांबरोबरच धुळीपासून बचाव करण्यासाठीही मास्क वापरात येत आहेत़औषधी दुकानांतील मास्क खरेदीबरोबरच फॅन्सी मास्क देखील मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत़ मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले ही चांगली बाब असली तरी त्या पाठीमागे कोरोना या आजाराची धास्तीही असल्याचे दिसत आहे़ दरम्यान, परभणी जिल्ह्यामध्ये कोरोना या आजाराचा कोणताही धोका नाही; परंतु, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, अर्धवट शिजलेले अन्न खावू नये, हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे़सॅनिटायझरचाही शहरात तुटवडा४शासन आणि प्रशासनाकडून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सुरू केल्यानंतर नागरिकांनीही स्वत:हून पुढाकार घेत आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे़ आतापर्यंत सॅनिटायझरचा वापर तुरळक प्रमाणात होत असल्याने शहरातील बाजारपेठेतही हा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हता़४मात्र आठवडाभरापासून सॅनिटायझरलाही मागणी वाढली आहे़ त्यामुळे दोन दिवसात सॅनिटायझरचा तुटवडाही जाणवू लागला आहे़ एकंदर नागरिकांनी आता स्वत:ची काळजी घेण्यास पुढाकार घेतला असल्याचेच यावरून दिसू लागले आहे़एन-९५ मास्क उपलब्धच नाहीत४कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एन-९५ हे मास्क वापरले जातात़ परभणी शहरात व जिल्ह्यात हे मास्क उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे़ मात्र जिल्ह्यात कुठेही हे मास्क उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे़४आरोग्य विभागाने एन-९५ मास्कची मागणी नोंदविली असून, येत्या काही दिवसांमध्ये ते जिल्ह्यास प्राप्त होतील, अशी अपेक्षा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे़ सध्या तरी आरोग्य विभागाकडून जागोजागी होर्डिग्ज, फलक लावून जनजागृती केली जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना