निराधारांना अनुदानाचे वाटप
ताडकळस: पूर्णा तालुक्यातील ताडकळस व परिसरातील १२ गावांमधील संजय गांधी निराधार योजनेंतर्गत २ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग केल्याची माहिती शाखाधिकारी दत्तराव अंबोरे, रोखपाल शिंदे यांनी दिली.
सहायक पोलीस निरीक्षक विजय रामोड रुजू
ताडकळस: पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून विजय गणपतराव रामोड हे ३० जानेवारी रोजी रुजू झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्र्यंबक खंदारे, तुकाराम शिंदे, सतीश तावडे, गौतम ससाणे आदींची उपस्थिती होती.
पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन
ताडकळस: पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. यावेळी दिवांश नावकीकर, श्रीशा नावकीकर, दीपाली नावकीकर, देवानंद नावकीकर, आशासेविका शेख यांची उपस्थिती होती.
सेलमोहा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
गंगाखेड : तालुक्यातील सेलमोहा येथे जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संतोष आळसे, तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के, आकाश गरड, रूपेश बोबडे, दिक्कतवार, मोटेगावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.