शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत, नऊ ठाण्यांना नवे कारभारी

By राजन मगरुळकर | Updated: February 14, 2023 18:33 IST

पोलिस नियंत्रण कक्ष येथे असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना नवीन नेमणुका मिळाल्या आहेत.

परभणी : जिल्ह्यातील नि:शस्त्र पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या आहेत. ३४ अधिकाऱ्यांच्या या बदलीच्या आदेशामध्ये जिल्ह्यातील नऊ पोलिस ठाण्यांना नवे कारभारी मिळाले आहेत.

या सर्व बदल्या प्रशासकीय कारणास्तव झाल्या आहेत. पोलिस अधीक्षकांच्या या आदेशाने काही ठिकाणी नवा गडी, नवा राज सुरू होणार आहे. पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या स्वाक्षरीने या बदल्या झाल्या  आहेत. दरम्यान, या ठाण्यांना नवीन अधिकारी मिळाले आहेत, सुभाष अनमूलवर - नवा मोंढा, सुनील नागरगोजे - परभणी ग्रामीण, कपिल शेळके - ताडकळस, सुनील रेजितवाड - सोनपेठ, नरसिंग पोमनाळकर - चुडावा, बुद्धीराज सुकाळे - पाथरी, कुंदनकुमार वाघमारे - जिंतूर, कृष्णा घायवट - बामणी, सरला गाडेकर - बोरी. 

या विभागांना नवे अधिकारीसंतोष सानप - कोर्ट पैरवी अधिकारी, संजय करनूर - सायबर पोलिस स्टेशन, दीपक दंतुलवार-जिल्हा विशेष शाखा, गणपत राहिरे-पोलीस कल्याण विभाग, सुनील माने - वाचक अप्पर पोलिस अधीक्षक, भारत जाधव - सीसीटीएनएस प्रणाली, शिवप्रकाश मुळे - भरोसा सेल, संदीप बोरकर - एटीसी, बीडीएस, चांद इब्राहिम सय्यद - वाचक, उपविभागीय पोलिस अधिकारी, गंगाखेड. विजय राठोड - पोलिस नियंत्रण कक्ष, माधव लोकूलवार - वाचक, उपविभागीय पोलिस अधिकारी, परभणी ग्रामीण, प्रकाश पंडित - दामिनी पथक, परभणी.

नियंत्रण कक्षातील वीस जणांची बदलीपोलिस नियंत्रण कक्ष येथे असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना नवीन नेमणुका मिळाल्या आहेत. जवळपास २० अधिकारी पोलिस नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील पोलिस ठाणे व अन्य विभागात बदली करून हलविण्यात आले आहेत. 

शहरात दोन ठाण्यांना नवे अधिकारीनवा मोंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिपान शेळके यांची बदली झाली आहे, तसेच त्यांना पोलिस उपअधीक्षक म्हणून पदोन्नतीही मिळाली आहे. या नवीन बदली आदेशात पोलिस नियंत्रण कक्षातील सुभाष अनमूलवार यांची नवा मोंढा ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांचीही काही महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता सुनील नागरगोजे हे प्रभारी अधिकारी राहणार आहेत. शहरातील कोतवाली आणि नानलपेठ ठाण्याचे अधिकारी कायम ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी