शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मनपा आयुक्तांचे दुर्लक्ष; मुलभूत सुविधाही नाहीत

By admin | Updated: June 17, 2014 00:38 IST

परभणी: मनपा आयुक्त म्हणून अभय महाजन हे रुजू झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचा कारभार सुधारेल, असे वाटले होते. परंतु, त्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी-

परभणी: मनपा आयुक्त म्हणून अभय महाजन हे रुजू झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचा कारभार सुधारेल, असे वाटले होते. परंतु, त्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिले नसून नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे मनपा गटनेते भगवानराव वाघमारे यांनी केला.या संदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्तांनाही दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मनपा स्थापन होऊन अडीच वर्षाचा कालावधी संपला. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था व स्वच्छतेसारख्या मुलभूत सुविधाही देण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. या सुविधा देण्यासाठी आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे त्याचा परिणाम अनेक विभागाच्या कामकाजावर होत आहे. जे कर्मचारी आहेत, त्यांच्यावरही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. महत्वाच्या खात्याचा कारभार हा रोजंदारीवरील कर्मचारी बघत असल्याने अनागोंदी आणि गैरव्यवहारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. विद्युत अभियंता नसल्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाली असून १५-१५ दिवस नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. विद्युत खांबावर चढून काम करणारे तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. शहरातील अनेक भागातील गटार तुंबलेले आहेत. कचऱ्याचे ढीग जागोजागी साचले असून शहरातील घंटागाड्या व पाण्याचे टँकर दुरुस्ती व डिझेलच्या अभावामुळे बंद पडत आहेत. दोन वर्षापासून नागरिकांना या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी केली.(जिल्हा प्रतिनिधी)