शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ३२ पोलीस कर्मचाºयांचा केला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:01 IST

पोलीस दलात विशेष कामगिरी बजावणाºया ३२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोलीस दलात विशेष कामगिरी बजावणाºया ३२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.जिल्हा स्टेडियम मैदानावर पार पडलेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पोलीस कर्मचाºयांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके व अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील नानलपेठ भागातून अभिषेक दावलबाजे या १२ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाले होते. या प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या दोन पथकांनी संयुक्त कामगिरी करीत अवघ्या २४ तासांत जिलानी खाजा सिकलकर आणि कलीम शाहनू सिकलकर या दोन आरोपींना लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मोठ्या शिताफीने अटक केली आणि अपहृत विद्यार्थ्याचीही सुटका केली होती. ही कामगिरी करणारे नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, सहायक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे, उपनिरीक्षक नागनाथ सनगले, सचिन द्रोणाचार्य, प्रकाश कापुरे, चंद्रकांत टाकरस, हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, सुरेश टाकरस, विठ्ठल कटारे, हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, किरण भूमकर, मुकेश बुधवंत, निलेश भूजबळ, अजहर शेख, राजेश आगाशे, सय्यद उमर सय्यद अमीन, नारायण घुगे, अरुण कांबळे या पोलीस कर्मचाºयांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या सात आणि औरंगाबाद, जालना व इतर ठिकाणाहून चोरलेल्या चार अशा ११ मोटारसायकली जप्त करुन मोटारसायकलचोरांना जेरबंद करण्याची कामगिरी जानेवारी महिन्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी केली होती. पोलीस निरीक्षक संजय हिबारे व सहाय्यक निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी बजावणाºया मधुकर शंकरराव पवार, शिवदास धुळगुंडे, शाम काळे, शरद मुलगीर, किशोर चव्हाण, गणेश कौटकर, यशवंत वाघमारे या पोलीस कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.तसेच सर्वाधिक वॉरंट बजावल्याबद्दल सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद मोईन, पोलीस नाईक एम.आर.बेग, अशोक वाकळे, मधुकर चट्टे, रामा कदम यांचा देखील पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.