शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून २५ हजारांना फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST

परभणी शहरातील विद्यानगर भागातील संकेत चारुदत्त पानसे यांना २५ मे रोजी त्यांच्या फेसबुकवर मारुती सुझुकी वॅगणार ही कार स्वस्तात ...

परभणी शहरातील विद्यानगर भागातील संकेत चारुदत्त पानसे यांना २५ मे रोजी त्यांच्या फेसबुकवर मारुती सुझुकी वॅगणार ही कार स्वस्तात विकत असल्याची एक पोस्ट दिसली. त्यामुळे त्यांनी या पोस्टवर नाव असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याने ८३४२०९५४११ मोबाइल नंबर संपर्क साधण्यासाठी दिला. पानसे यांनी या मोबाइलवर संपर्क साधला असता त्याने त्याचे नाव अमरीश मयेकर, राहणार पनवेल असे सांगून सध्या मी नाशिक देवळाली कॅम्प येथे आर्मीमध्ये आहे, असे सांगितले. तेव्हा पानसे यांनी सदरची कार पाहण्यासाठी कोठे व केव्हा येऊ, असे विचारले असता त्याने त्यांना मी देवळाली कॅम्पमध्ये आहे. तुम्हाला कॅम्पमध्ये भेटू देणार नाही. मी स्वतः कार घेऊन तुमच्या पत्त्यावर येतो. मला तुमचा पत्ता सांगा, असे सांगितल्यानंतर त्यांनी त्यास पत्ता दिला. त्यानंतर टोकन रक्कम म्हणून त्याने ५ हजार रुपये ७२३१०८०९८५ या क्रमांकावर फोन पेद्वारे पाठवण्यास सांगितले. त्यामुळे पानसे यांनी सदरील रक्कम पाठवली. त्यानंतर समोरील व्यक्तीने पैसे का पाठवले नाहीत, म्हणून पानसे यांना तुमचे पैसे बुडवणार नव्हतो, असे सांगतिले. पानसे यांनी पैसे पाठवल्याचे सांगितले. त्यावेळी पैसे मिळाले नाहीत, म्हणून त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याचे आर्मीचे ओळख पत्र व कारचे आरसी बुकची झेरॉक्स फोटो व त्याचा नाशिक येथील सहकारी मित्र मनिष खेमका याचेही ओळखपत्र व्हाॅटस्‌ॲपवर पाठवले. पानसे यांचा विश्वास बसल्याने नंतर समोरील व्यक्तीने मागणी केल्याप्रमाणे त्यांनी इन्शुरन्स, कारला ट्रॅकर बसवला आदी कारण सांगून त्यांच्याकडून एकूण २४ हजार ९९९ रुपये फोन पेद्वारे घेतले. तसेच दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत कार तुमच्या घरी येईल, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी कार घरी आली नाही. त्यामुळे त्यांनी सदरील दोन्ही मोबाइल नंबरवर फोन केला असता, दोन्ही नंबर बंद आढळले. याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १७ जून रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमरीश मयेकर याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.