हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त गुळखंड फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ६० संघाने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धा बारा दिवस चालल्या. या स्पर्धेत लगान क्रिकेट क्लब गुळखंड संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कोविड-१९ वन क्रिकेट क्लब संघाने द्वितीय तर फेमस क्रिकेट क्लब जिंतूर संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्या संघांना १४ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेख नईमुद्दीन कौसडीकर, मुजाहेद कादरी, अन्वर बेग, जाबेर मुल्ला, शेख इम्रान, मौलाना इसाक, अर्जुन लोखंडे, महादेव पाटील, नवनाथ लोखंडे, सलीम पटेल, बाळासाहेब जावळे, शंभूदेव जावळे, शंभूदेव दुधवडे, शेख मोहसीन, गौतम दुधवडे, शामराव जावळे, अशोक पुरी, दिनकर जावळे, सुंदर दुधवडे, राम लंगोटे यांची उपस्थिती होती.
खुल्या टेनिस बॉल स्पर्धेत गुळखंड संघाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:33 IST