पाथरी : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांतच कापूस खरेदी केंद्र कापसाअभावी बंद करण्याची वेळ पणन महासंघावर आली असून, या वर्षी केवळ ७३ हजार क्विंटल शासकीय कापूस खरेदी झाली आहे. म्हणजेच परतीच्या पावसात झालेली अतिवृष्टीचा कापूस उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत आहे.
मागील अनेक वर्षात या वर्षी सर्वाधिक पाऊस झाला. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात तर अतिवृष्टी मुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला. कापसाच्या पीक एका वेचणीत झडून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस उताऱ्यात घट झाली ५० टक्के पेक्षा अधिक उताऱ्यात घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला गेला शासनाने या वर्षी कापसाला ५ हजार ८००रुपये हमी भाव जाहीर केला. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या वतीने शासकीय कापूस खरेदी केंद्र डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी सुरू झाले. मात्र ३ डिसेंबर २०२० पासून सुरू झालेले शासकीय कापूस खरेदी केंद्र ३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तीनच महिन्यात कापसाअभावी बंद करावी लागली आहेत.
कापूस उत्पन्न कमी झाले असले तरी शेतकऱ्यांना मात्र गतवर्षी पेक्षा अधिक भाव मिळाला आहे. शेवटच्या टप्प्यात कापसाचे भाव वधारले आहेत. खाजगी कापूसही आता ५ हजार ७०० रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे.
पाथरी तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी तीन जिनिंगमध्ये करण्यात आली. ३ डिसेंबर ते ३ फेब्रुवारी या काळात ७३ हजार २१८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
नितीन जिनिंग
३४५३१ क्विंटल
एनसीसी जिनिंग खेडूळा
१४२८८ क्विंटल
अग्रवाल ऍग्रो इंदुस्ट्रीज बाभळगाव
२४४८० क्विंटल
कापूस विक्रीसाठी ८ हजार ६०५ शेतकऱ्यांची नोंदणी
८ हजार ६०५ शेतकऱ्यांनी शासकीय कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यातील ६ हजार ३२८ शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी बाजार समिती कडून एसएमएस पाठविण्यात आले होते. त्यातील २ हजार ८०६ शेतकऱ्यांनी कापूस विक्री साठी आणला.
गतवर्षी पाथरी तालुक्यात १ लाख ७६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. यावर्षीच्या तुलनेत दीड पट खरेदी झाली.