शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन जिल्ह्यांचा कारभार सेवकावर

By admin | Updated: February 13, 2015 15:25 IST

दोन जिल्ह्याचा कारभार पाहणार्‍या वैधमापनशास्त्र कार्यालयाचे कामकाज सहाय्यक नियंत्रकाअभावी ढेपाळले असून, वजनमापे तपासणी मोहीमही थंडावली आहे.

चंद्रमुनी बलखंडे /परभणीदोन जिल्ह्याचा कारभार पाहणार्‍या वैधमापनशास्त्र कार्यालयाचे कामकाज सहाय्यक नियंत्रकाअभावी ढेपाळले असून, वजनमापे तपासणी मोहीमही थंडावली आहे. त्यातच येथील कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यालयांनी कामकाज सेवकच हाकतो. परिणामी मापात पाप करणार्‍यांची संख्या बोकाळली आहे.ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी परभणी येथे वैधमापन शास्त्र कार्यालय कार्यरत आहे. वजन मापे वापरकर्त्यांची संख्या लक्षात घेता या विभागाअंतर्गत परभणी, वसमत, पूर्णा या तालुक्यासाठी एक आणि गंगाखेड, सोनपेठ, पालमसाठी एक असे दोन कार्यालय परभणी येथे कार्यरत आहेत. तसेच मानवत, जिंतूर, पाथरीसाठी सेलू येथे आणि औढा, सेनगाव, कळमनुरी, हिंगोली या तालुक्यासांठी हिंगोली येथे कार्यालय आहे. व्यापार्‍याकडील वजनांची वेळोवेळी तपासणी करणे, त्यांना प्रमाणित करणे व त्यावर मोहोर उमटवणे, परवाना देणे, परवाण्याचे नुतणीकरण करणे या कार्यालयामार्फत चालतात. परंतु कार्यालयातील कारभार पाहता अनेक दिवसांपासून वजनमापे वापरकर्त्याच्या वजनांची तपासणीच होत नसल्याने ग्राहकांची सर्रास लूट होत आहे. जिल्ह्यात लाखांच्या घरात वजन मापे वापरकर्त्यांची संख्या असताना या विभागाकडे वापरकर्त्यांची संख्याच उपलब्ध नाही. आगोदरच सहाय्यक नियंत्रक नांदेड येथून कारभार पाहत असल्याने कोणाचे नियंत्रणच राहिले नाही. त्यामुळे व्यापारी परवाना न घेताच वजने वापर करताना दिसून येत आहेत. काही व्यापारी तर वजन मापाऐवजी दगड, विटांचे मापे बनवून ग्राहकांना खुलेआम फसवण्याचे प्रकार घडत असताना वजनमापे निरीक्षकही भूमिगत झालेले दिसतात. तसेच वजन व मापे वापरणे, वजनांची उत्पादकता, विक्री करणे व दुरूस्तीसाठी या कार्यालयाच्या परवाण्याची आवश्यकता असते., परंतु जिल्ह्यात याची किती आकडेवारी आहे, याची माहिती या विभागाकडे नाही. विशेष म्हणजे, दर तीन महिन्याला तपासणीचा अहवाल आकडेवारीसह वरिष्ठांना सादर करावा लागतो. अवैध वजन मापे वापरकर्त्यावर केलेल्या कारवाईचीही माहिती द्यावी लागते. परंतु कार्यालयात संपर्क साधला असता, काय कारवाई केली, किती तपासण्या केल्या याची माहिती कर्मचारी सांगू शकत नाहीत. अधिकार्‍यांच्या कचखाऊ भूमिकेमुळे 'मापात पाप' करणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विभागाचा कारभार अलबेल असल्याचे दिसून आले.

कर्मचारी नेहमीच गायब > जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयासह दोन्ही निरीक्षक कार्यालये एकाच छताखाली आहेत. या तिन्ही कार्यालयातील कर्मचारी नेहमीच गायब असतात. त्यामुळे येथे कार्यरत सेवकांनाच येथील कार्यभार सांभाळावा लागतो. कागदपत्रांची जुळवाजुळव, आलेल्या नागरिकांचे समाधान याबरोबरच फाईलींची नोंदही सेवकांना करावी लागत आहे.परभणी कार्यालयात आल्यास माहिती सांगतो- कवरे> वैधमापनशास्त्र कार्यालयाकडून जिल्ह्यात झालेल्या तपासणी व कारवाईची माहिती घेण्यासाठी या कार्यालयात अनेक वेळा संपर्क साधला. परंतु एकही कर्मचारी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सेवकामार्फत सहाय्यक नियंत्रक एस.एन. कवरे यांच्याशी संपर्क साधला असता, मी परभणी कार्यालयात आल्यानंतर माहिती सांगतो, असे उत्तर त्यांनी दिले. परंतु कवरे केव्हा तरी कार्यालयात येत असतात, असे ग्राहकांमधून बोलले जात होते.