मागील आठव़ड्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्हाभरात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यात परभणी तालुक्याबरोबरच दैठणा मंडळाचाही समावेश आहे. दैठणा येथे काही घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झाले, तसेच शिर्शी बु. येथे २३३ मेंढ्या वाहून गेल्या. या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी सभापती गणेशराव घाटगे, दैठणाचे सरपंच राजाराम कच्छवे, मधुकर लाड, हनुमान शिंदे, माणिकराव शिंदे, मधुकर रायमाले, राजेश गमे, तुकारामजी गिराम, कोंडीबा किशनराव बुचाले, रामधन खोंड, संजय घाटगे, गजानन घाटगे, सुरेशराव कनके, भक्तराज लवंदे, मुंजाजी बुचाले, राहुल कच्छवे, अमोल रायमाले, गजानन कच्छवे, बाळासाहेब गमे आदी विविध गावांचे सरपंच, माजी सरपंच व सदस्यांनी केली आहे.
नुकसानग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST