शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडमध्ये विहीर अधिग्रहण नाही

By admin | Updated: May 31, 2014 00:26 IST

उद्धव चाटे, गंगाखेड तालुक्यात ८४ ग्रामपंचायती असून, त्याअंतर्गत १०६ गावांचा समावेश आहे़

उद्धव चाटे, गंगाखेड तालुक्यात ८४ ग्रामपंचायती असून, त्याअंतर्गत १०६ गावांचा समावेश आहे़ दरवर्षी तालुक्यामध्ये पाणीटंचाई भासते़ यावर्षी मात्र पंचायत समितीच्या अहवालानुसार कोणत्याच गावात पाणीटंचाई आढळून आली नाही़ त्यामुळे तालुक्यात एकही अधिग्रहण करण्यात आले नाही़ तालुक्यातील डोंगराळ भागात पाणीटंचाई जाणवू लागते़ परंतु, यावर्षी फेब्रुवारी व मार्च या महिन्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली तसेच छोटे मोठे पाझर तलाव भरले़ त्यामुळे यंदा उन्हाळ्यात तालुक्यामध्ये पाणीटंचाई भासली नाही़ गतवर्षी गंगाखेड तालुक्यातील जवळपास ५० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्यामुळे ८० हातपंप व विहिरींचे अधिग्रहण करावे लागले होते़ गणेशपुरी मठ, कासारवाडी, भेंडेवाडी, उमलानाईक तांडा या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता़ यासाठी अंदाजे २१ लाख रुपये पाणीटंचाईवर खर्च करण्यात आले होते़ यावर्षी मात्र तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीपैकी एकाही ग्रामपंचायतीमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याचा अधिग्रहणाचा एकही अर्ज आला नाही़ त्यामुळे शासनाचे पाणीटंचाईवर करण्यात येणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे़ पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे आता तालुक्यामध्ये पाणीटंचाई राहणार नाही़ यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे़ गेल्यावर्षी उन्हाळ्यात तालुक्यातील ५० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवली होती़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली होती़ यंदा मात्र एकाही गावात टँकरची गरज भासली नाही़ शासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो़ मात्र शासनाकडून कायमस्वरुपी पाणीटंचाईवर उपाय योजना करण्यासाठी म्हणावे तसे निर्णय घेतले जात नसल्याने तालुका टंचाईमुक्त होत नाही़ यंदा मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुका टंचाईमुक्त झाला आहे़ गंगाखेड तालुक्यात १०६ गावांचा समावेश आहे़ या तालुक्यातील डोंगराळ भागामध्येच पाणीटंचाई जाणवते़ परंतु, गेल्या वर्षी या तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला़ तसेच अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने गावातील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे़ गंगाखेड तालुक्यात पाणीटंचाईसाठी दरवर्षी ८० हातपंप व विहीर अधिग्रहणावर होणारा खर्च व राबविण्यात येणारी यंत्रणा तसेच होणारी धावपळ यावर्षी मात्र फेब्रवारी, मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झाली नाही़ ़ गेल्यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातच तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली होती़ हातपंप व शेतातील विहिरींवरून पाणी आणण्यासाठी ग्रामस्थ रात्रीबेरात्री भटकंती करीत होते़ यंदा मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली नाही़ कारण भूजल पातळीत वाढ झाली आहे़ तसेच छोटे मोठे पाझर तलाव व बंधारे भरले होते़