शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गोदा पात्र कोरडे पडले अन् उघड झाला पुरातन ठेवा; ११ व्या शतकातील मुर्ती, शिलालेख सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 13:09 IST

या प्राचिन दगडी शिल्पाचा ठेवा जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घेण्यात यावा अशी मागणी पुढे आली.

- अनिल शेटेगंगाखेड -  नृसिंह घाटाजवळ गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या पात्रालगत शुक्रवारी ( दि.३) ११ व्या शतकातील लक्ष्मी नारायणाची मुर्ती आणि शिलालेख सापडले आहेत. त्यामुळे शहराला पुरातन ठेवा असल्याचे पुरावे पुढे आले आहेत.

गोदावरी नदी घाटावर पुरातन नृसिंह मंदिर आहे. या नृसिंह मंदिर परिसरातील गोदावरी पात्रालगत व पात्रात अकराव्या शतकातील अंखड दगडात कोरीव व नक्षी काम केलेली लक्ष्मी नारायण मुर्ती, शिलालेख आणि भारवाहक, सती शिळ, नागशिल्प, नंदी असे अनेक दगडी कोरीव शिल्प आढळले. यातील काही शिल्प भग्नावस्थेत आहेत. या प्राचिन दगडी शिल्पाचा ठेवा जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घेण्यात यावा अशी मागणी पुढे आली.

परभणी जिल्हातील ऐतिहासिक वारसा कमिटीच्या वतीने इतिहास संशोधक प्रा.अविनाश खोकले व छायाचित्रण करण्यासाठी आलेले संदिप देऊळगावकर यांनी हेमाडपंथी मंदिर असलेल्या अंधारा महादेव, लक्ष्मीनारायण मंदिर , चिंतामणी मंदिर याची माहिती आणी छायाचित्रण घेऊन गोदावरी नदी येथिल नृसिंह मंदिराचे व परीसरातील छायाचित्रण घेण्यासाठी आले होते. दरम्यान, गोदावरी पात्रालगत  ऐतिहासिक खुणा असलेल्या भग्न अवस्थेतील दगडी शिल्प आढळले. लक्ष्मीनारायणाची अलंकृत कोरीव मुर्ती दिसून आली. प्राचीन इतिहासाची साक्ष असलेला मात्र दुर्लक्षीत ठेवा नृसिंह मंदिर जवळ सापडला.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणparabhaniपरभणीgodavariगोदावरी