शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

१३३ कोटींचा निधी सापडला आचारसंहितेच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

परभणी : जिल्हा नियोजन समितीला ८ डिसेंबर रोजी तब्बल १३३ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून यातील बहुतांश निधी हा ...

परभणी : जिल्हा नियोजन समितीला ८ डिसेंबर रोजी तब्बल १३३ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून यातील बहुतांश निधी हा जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी देण्यात येणार आहे. ११ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने हा निधी आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याचा २०० कोटी रुपयांंचा आराखडा सादर केला होता. त्यानुसार राज्य शासनाने नियोजन समितीला एप्रिल महिन्यात जिल्ह्याला ६५ कोटी ९१ लाख ९९ हजार रुपयांचा निधी दिला होता. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी यातील ३२ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपये वापरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून बहुतांश निधी जिल्हा परिषदेच्या विकास योजनांसाठी देण्यात येत असला तरी कोरोनामुळे तो उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी, जूनपासून डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेतील नवीन विकासकामे जवळपास ठप्प झाली होती. त्यामुळे राज्य शासन जिल्हा नियोजन समितीला कधी निधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबर रोजी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीला १३३ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी दिला. तसे आदेशही काढण्यात आले. त्यामुळे विकासकामांचा मार्ग मोकळा झाला, असे वाटत असतानाच ११ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे पुन्हा एकदा निधी खर्चास ब्रेक लागला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेची १५ डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती; परंतु ग्राम‌पंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. आता ग्रा.पं. आचारसंहिता २१ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर कुठे या निधीच्या खर्चाचे नियोजन जिल्हा परिषदेला करायचे आहे.

ध्वजारोहणास पालकमंत्री आल्यानंतरच निर्णय

विशेष म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरच पालकमंत्री नवाब मलिक हे २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणासाठी परभणीला येतील. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आराखड्यांना मंजुरी मिळेल. त्यांतर फेब्रुवारी महिन्यात निधी खर्चाची प्रक्रिया सुरू होईल. विविध विकास कामांच्या निविदांच्या प्रक्रियेस १ महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे विकासकामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास मार्च उजाडेल. विशेष म्हणजे ३१ मार्चच्या आत चालू आर्थिक वर्षाचा निधी खर्च करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची यासाठी मोठी कसरत होणार आहे.