जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने मारोती बनसोडे व अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आ. डॉ. राहुल पाटील यांना भेटले. या अनुषंगाने आ. डॉ. पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून पेव्हर ब्लॉक, समाज मंदिराचे सभागृह, मंगल कार्यालय प्रवेशद्वार उभारणी या कामांसाठी ६० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३१ मे रोजी या विकासकामांचे भूमिपूजन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, मारोती बनसोडे, राम तळेकर, अरविंद देशमुख, नगरसेवक सुनील देशमुख, अनंत बनसोडे, किशोर रनेर, मारुती तिथे, गणेशराव मिरासे, सचिन गारुडी एकनाथ पराडकर, सुरेश चांदणे, बाळू गवळे, लक्ष्मण बोबडे, शुभम नवघरे आदींची उपस्थिती होती.
खंडोबा मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ६० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST