शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत चार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:14 IST

हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी करुन क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी केल्याप्रकरणी परभणीतील नवा मोंढा भागातील चार व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी बाजार समितीला दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी करुन क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी केल्याप्रकरणी परभणीतील नवा मोंढा भागातील चार व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी बाजार समितीला दिल्या आहेत.आर्वी येथील शेतकरी उत्तम कदम यांनी ३ क्विंटल ६० किलो मूग विक्रीसाठी शुक्रवारी बाजार समितीत आणला; परंतु, तेथे मालाची एफएक्यू तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांनी बाजार समितीचे सचिव विलास मस्के यांची भेट घेऊन शेतमाल खरेदी करावा, असे साकडे घातले. मात्र मस्के यांनी वजनकाटा बंद असल्यामुळे हा माल बाजार समिती घेण्यात येणार नाही, असे सांगितले.त्यानंतर शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत हा माल घ्यावा, अशी विनंती केली; परंतु, आमच्याकडे माल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आपला माल वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवून या, असे सांगितले. त्यानंतर शेतकरी व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम यांनी हा माल जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आणून टाकला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून हा शेतमाल खरेदी करावा, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी बाजार समितीच्या सचिवांना बोलावून घेत काटा का सुरु केला नाही? त्रिसदस्यीय समितीची स्थापना का केली नाही, असे प्रश्न करुन धारेवर धरले. त्यानंतर शेतकºयांचा माल शेतमाल तारण योजनेंतर्गत तात्काळ ठेवून घ्या, असे आदेश दिले. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जोपर्यंत जिल्हा उपनिबंधक बाजार समितीमधील व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केलेल्या शेतमालाची पाहणी करणार नाहीत, तोपर्यत हा माल उचलला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुरु असलेली सहाय्यक उपनिबंधकांची बैठक अटोपून उपस्थित सर्व सहाय्यक उपनिबंधकांना घेऊन बाजार समितीच्या मार्केट यार्डात ते दाखल झाले. त्यानंतर बाजार समितीतील श्रीनिवास ट्रेडिंग कंपनी, राठी आडत दुकान, भारत ट्रेडिंग कंपनी व महेश ट्रेडिंग कंपनीची तपासणी केली. या तपासणीमध्ये व्यापाºयांनी शेतकºयांकडून हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केली. शेतमाल खरेदीची कोणतीही नोंद बाजार समितीकडे उपलब्ध नसल्याचे सुरवसे यांच्या पाहणीत आढळून आले. त्यानंतर सुरवसे यांनी मार्केट यार्डात सर्व व्यापाºयांची बैठक बोलविली.या बैठकीत शेतकºयांचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने व्यापाºयांनी खरेदी करु नये, बाजार समितीला कारभार पाहणे शक्य होत नसेल तर बाजार समिती बरखास्त करावी व ज्या व्यापाºयांनी शेतकºयांचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केला आहे, त्यामध्ये राठी आडत दुकान, श्रीनिवास ट्रेडिंग कंपनी, भारत ट्रेडिंग कंपनी, महेश ट्रेडिंग कंपनी या चार दुकानांचा परवाना निलंबित करण्याच्या सूचना बाजार समितीला दिल्या आहेत.परभणी बाजार समितीचा अनागोंदी कारभारपरभणी बाजार समितीची ई-नाम योजनेंतर्गत निवड झाली आहे. त्यामुळे बाजार समिती परिसरातील फडकरी व किरकोळ विक्रेत्यांना शेतमाल खरेदी- विक्रीसाठी बंदी घालण्यात आली होती. तसे राज्य शासनाचे आदेशही आहेत; परंतु, जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या पाहणीतून फडकरी व किरकोळ विक्रेते शेतकºयांचा माल खरेदी करताना दिसून आले. तसेच ज्या व्यापाºयांना शेत माल खरेदीचे परवाने आहेत, त्या व्यापाºयांकडून क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. व्यापाºयांनी खरेदी केलेल्या मालाच्या नोंदी बाजार समितीकडे आढळून आल्या नाहीत. त्याच बरोबर मागील काही महिन्यांपासून बाजार समितीतील वजनकाटा बंद आहे. हा सर्व प्रकार सर्रास सुरु असताना कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र मूग मिळून गप्प असल्याचे दिसून आले.कोºया संमती पत्रावर शेतकºयांच्या स्वाक्षºयाबाजार समितीतील त्रि सदस्यीय समितीकडून एफएक्यू व नॉन एफएक्यू शेतमाल तपासणीसाठी कोणतेही पाऊले उचलण्यात येत नाहीत. त्यामुळे व्यापाºयांनी शेतकºयांकडूनच संमतीपत्र भरुन घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी केलेल्या पाहणीमध्ये राठी आडत दुकानामध्ये तर कोºया संमतीपत्रावर शेतकºयांच्या स्वाक्षºया आढळून आल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती