शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील चारही आरोपी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:10 IST

मानवत येथील खून प्रकरणातील चारही प्रमुख आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. एका आरोपीस सोलापूर येथे तर इतर तिघांना पुणे येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मानवत येथील खून प्रकरणातील चारही प्रमुख आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. एका आरोपीस सोलापूर येथे तर इतर तिघांना पुणे येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.नागनाथ लेंगुळे या युवकाच्या खून प्रकरणी अमरदीप रोडे, व्यंकट शिंदे, दीपक बारहाते, शेख हाजू या चार प्रमुख आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु होते. उशिराने यश आल्याचे झळके यांनी सांगितले. या प्रकरणातील एक आरोपी सिकंदराबाद येथून हुसेन सागर एक्सप्रेसने सोलापूर येथे जाणार असल्याची माहिती परभणी पोलिसांना मिळाली. त्यावरुन सोलापूर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्यांना आरोपीची संपूर्ण माहिती, छायाचित्र पाठविले. सोलापूर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण रेल्वे तपासली. त्यात अमरदीप रोडे हा मिळून आला. अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी भ्रमणध्वनीवरुन अमरदीप रोडे याच्याशी संपर्क साधून इतर आरोपींची माहिती घेतली. तेव्हा बंटी नावाचा एक व्यक्ती पुणे स्थानकावर येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे परभणी पोलिसांनी बंटी याची सर्व माहिती, फोटो, संकलित करुन पुणे क्राईम ब्रँचच्या अधिकाºयांना दिली. ३० जुलैच्या रात्रीच दीड वाजता बंटीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती काढत अतुलनगर सोसायटी (ता.हवेली) येथून व्यंकट शिंदे, दीपक बारहाते आणि शेख आजू या तीन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात आता आठ आरोपी अटक झाले आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, नानलपेठ पोलीस ठाणे आणि सायबर सेलच्या कर्मचाºयांनी हा गुन्हा उघडकीस आणला. या पत्रकार परिषदेस विश्व पानसरे, संजय हिबारे यांची उपस्थिती होती.