शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निम्न दुधनाचे पाणी परभणीकडे झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:38 IST

निम्न दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून ६ फेब्रुवारी रोजी ११८१ क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात आला आहे़ परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणी संपल्याने दुधना प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : निम्न दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून ६ फेब्रुवारी रोजी ११८१ क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात आला आहे़ परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणी संपल्याने दुधना प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात आले आहे़परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा होतो़ या बंधाºयातील पाणी संपल्याने दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता़ या निर्णयानुसार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास प्रकल्पाचे तीन दरवाजे १० सेमीने तर एक दरवाजा ७ सेमीने वर उचलून ११८१ क्युसेस पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले. ४८ तासांमध्ये हे पाणी राहटी बंधाºयात पोहोचणार आहे़ परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी यापूर्वी येलदरी प्रकल्पातून पाणी घेतले जात होते़ यावर्षी येलदरी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ त्यानुसार मंगळवारी १ दलघमी पाणी परभणी शहरासाठी घेण्यात आले़ यापूर्वी २२ डिसेंबर रोजीही निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते़ मात्र हा पाणीसाठा संपल्याने मंगळवारी पुन्हा एकदा प्रकल्पातून पाणी घेण्यात आले आहे़यावर्षी निम्न दुधना प्रकल्पामध्ये परभणी शहराबरोबरच पूर्णा शहरासाठीही पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ दोन्ही शहरांसाठी प्रकल्पातील ३० दलघमी पाणी आरक्षित केले असून, यापूर्वी प्रकल्पामधून एक संयुक्त पाणी पाळी घेण्यात आली होती़ मंगळवारी परभणी शहरासाठी स्वतंत्र पाणी पाळी घेण्यात आली आहे़ १ दलघमी पाण्यासाठी प्रकल्पातून ७ दलघमी पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे़ ही बाब लक्षात घेता येलदरी प्रकल्पातील पाण्याच्या आरक्षित साठ्यामध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे़५८ टक्के पाणी शिल्लकनिम्न दुधना प्रकल्पात सध्या २४४़८० दलघमी एकूण पाणीसाठा उपलब्ध असून त्यात १४२ दलघमी (५८ टक्के) जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे़ दुधना प्रकल्पातून सध्या सेलू शहर, आडगाव पाणीपुरवठा योजना आणि परतूर शहराला पाणीपुरवठा केला जातो़ आता त्यात परभणी व पूर्णा शहराची भर पडली आहे़