शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत वाळू चोरी प्रकरणी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:32 IST

जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १५७४ ब्रास वाळू चोरी झाल्या प्रकरणी वाळू साठवणूक करणाºया ८ जणांविरुद्ध महसूल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १५७४ ब्रास वाळू चोरी झाल्या प्रकरणी वाळू साठवणूक करणाºया ८ जणांविरुद्ध महसूल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.पाथरी तालुक्यात जुलै २०१७ या महिन्यात २२ ठिकाणी अवैध वाळूसाठे जप्त करण्यात आले होते. जप्त वाळूसाठे संबंधित गावाच्या पोलीस पाटलांच्या ताब्यातही देण्यात आले होते. २२ वाळू साठ्यात जवळपास ४ हजार ५०० ब्रास वाळू साठविण्यात आली होती. मात्र जप्त वाळूसाठ्याला पाय फुटल्याचा प्रकार महसूल विभागाच्या पंचनाम्यात समोर आला होता. जप्तवाळू साठ्यापैकी ९ वाळूसाठ्यातील २ हजार ब्रास वाळू चोरी झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या आदेशानुसार वाळूसाठे ज्या ठिकाणी करण्यात आले आहेत, त्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले होते. मात्र यावर कोणतीच कारवाई होत नव्हती.४ मार्च रोजी याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महसूल विभागाने तातडीने कारवाईसाठी पाऊल उचलली. याबाबत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रकाश गोवंदे यांच्या फिर्यादीवरुन ८ जणांवर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये हादगाव बु., मरडसगाव, वरखेड, मसला खु., लिंबा, डाकू पिंपरी, तारुगव्हाण या गावातील गट नंबरातील १५७४ ब्रास वाळू चोरी प्रकरणी बाबु वामन, पांडुरंग निर्वळ, भास्कर ढगे, ईश्वर ढगे, बापु कुटे, सय्यद एहसान सय्यद पाशा, अरविंद रेड्डी व इतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.