शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खत प्रकरणी पूर्ण्यात तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 18:02 IST

बनावट खताचा पुरवठा व विक्री केल्याप्रकरणी खत कंपनीच्या मालक व वितरकासह विक्रेत्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात कृषी अधिकारी प्रभाकर इंगोले यांच्या फिर्यादीवरून १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला आहे. 

ठळक मुद्देपंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक प्रभाकर गोपाळराव इंगोले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अहवालानुसार या खतामध्ये अमोनियमन नायट्रोजन १२ टक्के आवश्यक असताना तो ३.४१ टक्के निघाला. वॉटर सेल्युशन फॉसफेट ६१ टक्के आवश्यक असताना ते ६.६२ टक्के आढळूून आले.

पूर्णा : बनावट खताचा पुरवठा व विक्री केल्याप्रकरणी खत कंपनीच्या मालक व वितरकासह विक्रेत्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात कृषी अधिकारी प्रभाकर इंगोले यांच्या फिर्यादीवरून १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक प्रभाकर गोपाळराव इंगोले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. येथील तिरुपती कृषी केंद्रातून २१ सप्टेंबर २०१७ रोजी पाण्यात विद्राव्य रासायनिक खताचा (१२-६१-००) उत्पादक कृषीधन अ‍ॅग्रो तलवाडे व वितरक जयकिसान अ‍ॅग्रोटेक औरंगाबाद यांचा अहवाल औरंगाबाद येथील खत प्रयोग शाळेमध्ये पाठविला होता. याचा अहवाल उपलब्ध झाला असून यामध्ये या खतामध्ये अमोनियमन नायट्रोजन १२ टक्के आवश्यक असताना तो ३.४१ टक्के निघाला. वॉटर सेल्युशन फॉसफेट ६१ टक्के आवश्यक असताना ते ६.६२ टक्के आढळूून आले. यावरून खत उत्पादक, वितरक व खत विक्रेता यांनी बनावट खताची आयात, पॅकींग, पुरवठा व विक्री करून खत नियंत्रण आदेश १९८५ च्या कलमानुसार विविध मानांकन नसलेला बनावट खताचा पुरवठा व विक्री केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पूर्णा येथील तिरूपती कृषी केंद्र, मे.कृषीधन अ‍ॅग्रो तलवडे, जयकिसान अ‍ॅग्रोटेक औरंगाबाद यांच्या मालकाविरुद्ध शेतकरी व शासनाच्या फसवणुकीसह जीवनाश्यक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल ओव्हळ अधिक तपास करीत आहेत. 

३५ दुकानाचे परवाने निलंबितपावतीशिवाय औषधींची विक्री करणे, मुदतबाह्यऔषधींची साठवणूक विक्री तसेच योग्य औषधी समवेत ठेवणे या व अन्य कारणावरून वर्षभरात परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३५ मेडीकलचे परवाने निलंबित केले असून सात परवाने कायमचे रद्द करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. ही कारवाई एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान करण्यात आली आहे. परभणी व हिंगोलीच्या कार्यंक्षेत्रातील ३४६ दुकानांची तपासणी केली आहे. तक्रार असल्यास कार्यालयाकडे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी