गोरगरीब नागरिकांची जेवणासाठी आबाळ होऊ नये, या उद्देशाने शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठरावीक कोट्यापर्यंत मोफत भोजन दिले जाते. लॉकडाऊनचा काळ लक्षात घेऊन शासनाने शिवभोजन थाळीचा कोटा वाढविला आहे. मात्र, तरीही दररोज येथील शिवभोजन थाळी केंद्रावरून सरासरी १५ ते २० जण उपाशीपोटीच परत जात आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या भोजनाचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
२५ जण उपाशीपोटी परतले
बसस्थानक केंद्र : येथील केंद्रावर दररोज असलेल्या कोट्यापेक्षा अधिक लाभार्थी शिवभोजनासाठी येतात. मात्र, कोटा संपल्याने दररोज १० ते २० जण परत जातात. रविवारीदेखील कोट्यापेक्षा अधिक लाभार्थी केंद्रात दाखल झाले होते.
नवा मोंढा केंद्र : येथील केंद्रावर रविवारी ४१५ जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. मात्र, कोटा कमी पडत असल्याने दररोज १५ ते २० लाभार्थी परत जातात. सुटीच्या दिवशी ही संख्या अधिक असते. त्यामुळे अनेकांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते.
रोज २५ हजार जणांचे पोट भरते; बाकीच्यांचे काय?
जिल्ह्यात दररोज सुमारे २५ हजार नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळतो.
जिल्हाभरात दररोज ८ ते १० हजार नागरिक उपाशी राहतात, त्यांचे काय?