शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

 कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 08:47 IST

कर्जाचा बोजा आणि पेरणी वाया गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी आत्महत्या करू नये, या भीतीतून एका शेतकºयाच्या मुलीने स्वत:चे जीवन संपविल्याची घटना जवळा झुटा येथे मंगळवारी घडली.

पाथरी (जि. परभणी) : कर्जाचा बोजा आणि पेरणी वाया गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी आत्महत्या करू नये, या भीतीतून एका शेतकºयाच्या मुलीने स्वत:चे जीवन संपविल्याची घटना जवळा झुटा येथे मंगळवारी घडली. मुलीच्या काकांनी सहा दिवसांपूर्वीच नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती.दोन महिन्यांपासून तालुक्यात पाऊस नसल्याने खरिपाची पेरणी वाया गेली आहे. पिके करपल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासनाच्या कर्जमाफीचा अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी तणावाखाली आहेत. त्यातून जवळा झुटा येथील चंडिकादास झुटे यांनी ३ आॅगस्टला विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांची पुतणी सारिका सुरेश झुटे (१७) हिने ८ आॅगस्टला आत्महत्या केली.सारिका ही बीड जिल्ह्यातील शिवनी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. पंचमीच्या सणासाठी ती गावाकडे आली होती. आत्महत्येपूर्वी तिने लिहून ठेवलेले पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. आपल्या काकांवर जी वेळ आली तीच वेळ बाबांवर येऊ नये, त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे तिने पत्रात म्हटले आहे. सुरेश झुटे यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. मागील वर्षी एका मुलीचे लग्न झाले आहे. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. ते अजून पूर्णपणे फिटलेले नाही. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा बँकेचे कर्ज आहे.सारिकाने लिहिलेले पत्रप्रिय बाबा,आपल्या भाऊंनी पाच ते सहा दिवसांपूर्वी शेतातील सर्व पीक जळून गेल्याने आत्महत्या केली. आपल्या घरावर कर्जाचा बोजा, त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून पेरणी केली. मात्र सर्व जळून गेले. तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्या वर्षी लग्न झाले. तेच कर्ज अजून फिटले नाही. तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखे करू नये, यामुळे मी माझे जीवन संपविते.तुमची - सारिका