शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात : परभणीत पत्रकार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:41 IST

फसवी कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हे सरकारचे अपयश असून शेतकºयांच्या हक्कासाठी २३ मार्चपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : फसवी कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हे सरकारचे अपयश असून शेतकºयांच्या हक्कासाठी २३ मार्चपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी दिली.येथील सावली विश्रामगृहावर २३ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रघुनाथ पाटील यांच्यासह सुकाणू समितीतील सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, किसान सभेचे विलास बाबर, अ‍ॅड.राजन क्षीरसागर, बंडू सोळंके, अमृतराव शिंदे, लिंबाजी कचरे, बालासाहेब आळणे, माऊली कदम, सलीम शेख, प्रल्हाद जाधव, रामराजे महाडिक, मुंजाभाऊ कदम, नारायण आवचार, मोहन मानोलीकर आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी १६ फेब्रुवारीपासून सांगली येथून पायलट दौरा सुरु करण्यात आला आहे. सरसगट कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शासनाने शब्द फिरविला. बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज, कर, वीज बिल भरु शकत नाही. त्यामुळे २३ मार्चपासून असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. किशोर ढबाले म्हणाले, २३ मार्च रोजी हुतात्मा अभिवादन शेतकरी शहीद स्मृती दिवसापासून इस्मालपूर येथून जागर यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिल रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हमीभाव न देता शेतकºयांची लूटराज्य शासनामार्फत नुसते निर्णय घेऊन शेतकºयांची फसवणूक केली जात आहे. प्रत्येक शेतमालाला हमीभाव जाहीर केला जातो. परंतु, प्रत्यक्षात हा हमीभाव मिळत नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणे गुन्हा असताना याविरुद्ध कारवाई होत नाही. मागील आंदोलनाच्या वेळी दुधाला हमीभाव जाहीर करण्यात आला. परंतु, आतापर्यंत या हमीभावाने दुधाची खरेदी झाली नाही. परिणामी राज्यातील शेतकºयांची ४ हजार २०० कोटी रुपयांची लूट झाली. शासनाला शेतकºयांविषयी गांभीर्य नसल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.