शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाथरीत तालुक्यात पुरात कुटुंब अडकले; पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:13 IST

वाघाळा गाव परिसरात वास्तव्यास असलेले आदिवासी कुटुंब रात्री पुरात अडकून पडले.

पाथरी : गुरुवारी (दि. २४ ) सायंकाळी तब्बल चार तास झालेल्या मुसळधार पावसाने पाथरी तालूक्यातील नदी-नाल्यांना पूर आला, त्यामुळे शेतामध्ये खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाघाळा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावचा रस्ता बंद पडला. तसेच वाघाळा गाव परिसरात वास्तव्यास असलेले आदिवासी कुटुंब रात्री पुरात अडकून पडले. तर वडी येथील पुलाला पाणी आल्याने हा रस्ता ही बंद पडला होता. 

24 ऑक्टोबर रोजी दिवसभर सकाळपासून पावसाची रिपरिप चालू होती. दुपारनंतर पावसाने विसावा घेतला मात्र सायंकाळी सहानंतर जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पाथरी तालुक्यामध्ये अतिवृष्टीची झाली. तालुक्यात 83.33 मीमी पाऊस झाला. पाथरी तालुक्यात पावसाने आधीच वार्षीक सरासरी ओलांडली आहे. काल झालेल्या पावसाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बीमध्ये पेरणी झालेल्या ज्वारी पिकाचे नुकसान झाले . त्यामुळे रब्बी पेरणीतील पिकांनाही याचा फटका बसणार आहे . खरिपातील काढणीस व वेचणीस आलेल्या सोयाबीन, कापुस पिक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने करावेत व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

पुरात कुटुंब अडकले ग्रामीण भागांमध्ये नदीनाल्यांना पूर आल्याने गाव नदीकाठावरील शेत शिवारामध्ये पाणी घुसल्याने जमीन वाहून गेली. पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये चिल्लारीच्या काटेरी झाडापासून कोळसा निर्मिती करणारे काही आदिवासी नदी पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते .पुराच्या पाण्यात रात्रभर राहील्यानंतर ते सकाळी सुखरूप बाहेर पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

पुरामुळे अनेक रस्ते बंद

नदी पुलावरून पाणी वाहत असल्यांने सकाळी दहा वाजेपर्यंत तालुक्यातील वाघाळा, मुदगल, फुलारवाडी आदी गावातील लोकांचा तुटला होता. मुदगल जाणारी बस वाघाळा पुला पासून परत आली. तसेच वडी शिवारात पाणी वाढल्याने निवळी पाटोदा , गोपेगाव वाहतूक बंद होती, पुलाला पाणी असल्याने निवळी बस वडी येथून परत आली. खेरडा शिवारात अशोक सीताफळे यांचे सोयाबीन पाण्यात गेले, तर सारोळा भागात कापलेले सोयाबीन पाण्यात बुडाले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरparabhaniपरभणी