शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पाथरीत हॉटेलचालकाने तयार केली नगरपालिकेची बनावट कागदपत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:47 IST

नगरपालिकेची बनावट  कागदपत्रे तयार करून न्यायालयातील एका प्रलंबित प्रकरणात सादर केल्या प्रकरणी पाथरी येथील एका हॉटेलचालकावर नगरपालिकेच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाथरी : येथील नगरपालिकेची बनावट  कागदपत्रे तयार करून न्यायालयातील एका प्रलंबित प्रकरणात सादर केल्या प्रकरणी पाथरी येथील एका हॉटेलचालकावर नगरपालिकेच्या तक्रारीवरून २७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाथरी शहरातील बसस्थानकासमोर नगरपालिकेच्या शहराला पाणीपुरवठा करणार्‍या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. या ठिकाणाहून विविध भागात पाईपलाईन गेली आहे. या पाईपलाईच्या जागेवर माजी उपनगराध्यक्ष अली अफसर अन्सारी हे सदस्य असताना या भागात हॉटेलचे बांधकाम केले आहे. पाईपलाईन या जागेवरून जात असल्याने नगर पालिकेने ही हॉटेल पाडण्याची कारवाई केली होती. सध्या हे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे हॉटेल पाडण्याची कारवाई थांबली. 

अली अफसर अन्सारी यांनी त्यांच्या सदस्य पदाच्या कार्यकाळात त्या हॉटेलखाली पाईपलाईन नसल्याचे नगरपालिकेचे कागदपत्र तयार करून न्यायालयात दाखल केले. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू असताना ज्या जागेत नगरपालिकेचे पाईपलाईन आहे, त्या जागेत पाईपलाईन नसल्याचे कागदपत्रे सादर केली गेली असल्याचे समोर आले. या प्रकरणी पालिका प्रशासनाने कागदपत्रे तपासली असता ती कागदपत्रे खोटे आणि बनावट असल्याचे दिसून आले. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक मुशिरुद्दीन जाहीरोद्दीन फारोखी यांनी हॉटेलमालक अली आदेल अकबर अन्सारी व अली अन्सर अकबर अन्सारी यांच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात नगरपालिकेच्या दोन संशयित कर्मचार्‍यांवर आरोप करण्यात आला असल्याने ते दोन कर्मचारी कोण आहेत? हे चौकशीतून पुढे येणार आहे.

पालिकेतील दोन कर्मचार्‍यांवर संशयपाथरी नगर पालिकेची बनावट कागदपत्रे तयार करून ती न्यायालयात सादर केल्याची बाब समोर आल्यानंतर पालिकेने या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या अनुषंगाने नगरपालिकेतील दोन कर्मचार्‍यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. ते दोन कर्मचारी कोण? याबाबत शहरात चर्चा होत आहे.