शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:19 IST

जिल्ह्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. या योजनेची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु, शेतकºयांचा वाढता प्रतिसाद पाहता या योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. या योजनेची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु, शेतकºयांचा वाढता प्रतिसाद पाहता या योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.जिल्ह्यात महावितरणचे जवळपास २ लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांपैकी ९२ हजार ग्राहक हे कृषीपंपधारक आहेत. त्यापैकी ९० हजार ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ७५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. या योजनेत ज्या थकबाकीदार शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. त्या कृषीपंप धारकांची थकबाकी ३० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास ती थकबाकी १० समान हप्त्यामध्ये प्रत्येक दीड महिन्याच्या कालावधीत भरणा करावी लागणार आहे. यामध्ये पाच हप्ते देण्यात येणार आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी कृषीपंपधारकाला चालू महिन्याचे वीज बिल भरुन डिसेंबरपासून मूळ थकबाकीपैकी २० टक्के पहिला हप्ता भरावा लागणार आहे. त्यानंतर मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर २०१८ पर्यंत प्रत्येकी २० टक्क्यासह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावी लागणार आहे. जिल्ह्यातील कृषीपंपधारकांचा वाढता सहभाग पाहता नांदेड परिमंडळात शनिवारी झालेल्या बैठकीत या योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. थकबाकीदार कृषीपंपधारकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले.