शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने निधी, वेळ समर्पित करावा : भरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:20 IST

परभणी : श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आपला निधी आणि ठरावीक वेळ समर्पित करावा, ...

परभणी : श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आपला निधी आणि ठरावीक वेळ समर्पित करावा, असे आवाहन भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केले.

येथील गांधी पार्क भागातील श्री राजाराम मंदिर येथून गुरुवारी श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण महाअभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचे उद्‌घाटन आनंद भरोसे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. भरोसे म्हणाले, १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या एक महिन्याच्या काळात अभियान राबविले जाणार आहे. महिनाभर प्रत्येकाने दोन तासांचा वेळ समर्पित करून आपली सेवा रुजू करावी, असे आवाहन भरोसे यांनी केले.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष अनंत पांडे, डॉ. संजय टाकळकर यांच्यासह नगरसेवक मधुकर गव्हाणे, पमू सोनी, सतीश नारवानी, दीपक टाक, दिनेश नरवाडकर, माऊली पोहंडूळकर, उदय जैन, रामदेव ओझा, विलास चांदवडकर, अजय फुलारी, सुरेंद्र टाक, अमोल डहाळे, सुप्रिया कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

पुढील एक महिन्याच्या कालावधीत प्रत्येकाने दररोज किमान पाच परिवाराला भेट देऊन या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन अनंत पांडे यांनी केले. कार्यक्रमास पदाधिकारी उपस्थित होते.